Taliban
Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban: तालिबानने 14 महिलांसह 63 जणांविरुद्ध दाखवली क्रूरता, संयुक्त राष्ट्राने नोंदवला निषेध; म्हणाले...

Manish Jadhav

Taliban: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीचा क्रूरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तालिबानने 14 महिलांसह 63 जणांना जाहीरपणे फटके मारले. या लोकांवर अनैसर्गिक लैंगिक छळ, चोरी आणि अनैतिक संबंधांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तालिबानच्या या क्रूरतेवर संयुक्त राष्ट्राने जाहीर निषेध नोंदवला. युनायटेड नेशन्स असिस्टन्स मिशन (UNAMA) ने या भयानक शिक्षेचा निषेध केला आहे.

UNAMA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या निवेदनात म्हटले की, अफगाण अधिकाऱ्यांनी मंगळवारी 63 लोकांना चाबकाचे फटके मारले. वृत्तानुसार, सारी पुल प्रांतात तालिबान्यांनी डझनभर महिलांसह 60 हून अधिक लोकांना चाबकाचे फटके मारले. संयुक्त राष्ट्र कार्यालयाने तालिबानच्या या क्रूरतेचा तीव्र निषेध केला. निषेधावरच न थांबता त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दायित्वांचा आदर करण्यास सांगितले.

काय आहे प्रकरण?

तालिबानच्या सर्वोच्च न्यायालयाने 14 महिलांसह 63 जणांना सार्वजनिकपणे फटके मारण्याचा आदेश दिला. या लोकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी आणि अनैतिक संबंध यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. या सर्वांना स्टेडियममध्ये फटके मारण्यात आले. अफगाणिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, व्यभिचार आणि घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरलेल्या एक पुरुष आणि स्त्रीला सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले.

दरम्यान, 2021 मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने देशात लोकशाही पद्धतीचे सरकार स्थापन होईल असे जगाला सांगितले होते. मात्र, सर्व दाव्यांच्या उलट तालिबान सरकारचा क्रूरपणा सातत्याने समोर येत आहे. महिलांविरोधात कठोर कायदे, महिलांच्या शिक्षणावर बंदी, महिलांसाठी बुरखा अनिवार्य असे अनेक कायदे तालिबान सरकारने बनवले. विशेष म्हणजे, किरकोळ गुन्ह्यांसाठीही फाशी, फटके मारणे अशा शिक्षा सध्या तालिबानशासित अफगाणिस्तानात आहेत. 1990 च्या दशकातही तालिबानने अशीच क्रूरता दाखवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT