Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Afghanistan: अशातच, युद्ध आणि खराब आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तालिबान अनेक पावले उचलत आहे.
Taliban
TalibanDainik Gomantak

Taliban: अफगाणिस्तानची सत्ता आपल्या हाती घेतल्यापासून तालिबानने अनेक निर्बंध लादले आहेत. अशातच, युद्ध आणि खराब आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तालिबान अनेक पावले उचलत आहे. तालिबान प्रशासन अफगाणिस्तानमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि देशाला उत्तर आशियासह दक्षिण आशियाशी जोडणारा व्यापारी मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, उत्तर आशियाला दक्षिण आशियाशी जोडणारा व्यापारी मार्ग तयार करण्यासाठी तालिबानने कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबत (Turkmenistan) करार केला आहे.

तालिबान सरकारमधील वाणिज्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने पश्चिम अफगाणिस्तानमध्ये लॉजिस्टिक हब तयार करण्यासाठी कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबत बैठक घेतली आहे, ज्याचा उद्देश युद्धग्रस्त देशाला (अफगाणिस्तान) रशियापासून दक्षिणेकडे तेलासह प्रादेशिक निर्यातीसाठी एक महत्त्वाचे लॉजिस्टिक हब बनवणे आहे.

Taliban
Pakistan Taliban Tension: ''आम्हाला युद्ध नकोय'', तालिबानने डोळे वटारुन पाहताच पाकिस्तानकडून आलं मोठं वक्तव्य

गेल्या आठवड्यात तालिबान (Taliban) सरकारमधील मंत्री नूरुद्दीन अझीझी यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, सहा महिन्यांच्या चर्चेनंतर, हे ठरले आहे की तीनही देश या हबसाठी औपचारिक योजनांवर दोन महिन्यांत लेखी करार करतील. दुसरीकडे मात्र, परकीय निधी येणं बंद झाल्यानंतर आणि देशात भीषण दुष्काळ पडल्यानंतर तालिबान आपला वाटा या मोठ्या प्रकल्पात कसा गुंतवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानने कबूल केले आहे की अफगाणिस्तान, त्याच्या लोकेशनमुळे रशियाला आशियाशी जोडण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. अफगाणिस्तान, चीन, भारत, इराण, पाकिस्तान आणि यूएसएसआरमध्ये या हबच्या निर्मितीनंतर आयात आणि निर्यातीत मोठा फायदा होऊ शकतो. या मार्गाने तेल, कापड, मसाले, सुका मेवा आदींच्या व्यापारास चालना मिळण्याची शक्यता आहे.

Taliban
Taliban: तालिबान्यांची क्रूरता पुन्हा दिसली; हजारो लोकांसमोर 2 जणांना दिली थरकाप उडवणारी शिक्षा

दरम्यान, चीन आणि इराणची मैत्री कोणापासून लपलेली नाही. मंत्री नूरुद्दीन अजीजी यांनी सांगितले की, तालिबान अधिकाऱ्यांनी चीनला इराणशी जोडण्यासाठी रस्ता बांधणीबाबत चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. चीन आणि इराणमधील व्यापारासाठी हा रस्ता स्वस्त आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे.

अफगाणिस्तानला फायदा काय?

हे हब पूर्ण झाल्यानंतर अफगाणिस्तानमधील परदेशी उलाढाल वाढेल ज्याचा फायदा अनेक अफगाण व्यवसायांना होईल. मार्ग तयार झाल्यानंतर अफगाणिस्तानला या मार्गावरुन जाणाऱ्या मालावर टॅक्स लावून चांगले महसूल मिळू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com