Taliban  Dainik Gomantak
ग्लोबल

दाढी नाही, मग नोकरी नाही; तालिबानचे नवीन फर्मान

गेल्या आठवड्यात तालिबानने महिलांसाठी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते.

दैनिक गोमन्तक

महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानने आता पुरुषांसाठी नवे फर्मान काढले आहे. दाढी न ठेवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल, असे तालिबानने म्हटले आहे.

तालिबाननेही ड्रेसकोडबाबत कठोर भूमिका घेतली असून, कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोड पाळला नाही तर त्यांना नोकरी (Job) गमवावी लागेल, असे म्हटले आहे. तालिबानशी (Taliban) संबंधित सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना लांब, सैल-फिटिंग कुर्ता-पायजामा आणि टोपी किंवा पगडी घालण्यास सांगितले आहे. याबाबत मंत्रालयाच्या प्रवक्त्याला विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

गेल्या आठवड्यात तालिबानने महिलांसाठी (Women) अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. तालिबानने पुरुष नातेवाईकाशिवाय महिलांच्या विमान प्रवासावर बंदी घातली होती. तालिबानने म्हटले आहे की देशात किंवा देशाबाहेर विमानाने प्रवास करण्यासाठी स्त्रीला पुरुष नातेवाईकासोबत असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT