Taliban Leader Mulla Hibatullah Akhundzada Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: तालिबानी नेत्याने जारी केला असा फर्मान, वाचून तुम्हीही व्हाल चकित!

Taliban Leader: तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून ते त्यांच्या फर्मानांमुळे चर्चेत आले आहे. याच एपिसोडमध्ये तालिबानने यावेळी जारी केलेले फर्मान थक्क करणारे आहे.

Manish Jadhav

Taliban Leader Mulla Hibatullah Akhundzada: तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून ते त्यांच्या फर्मानांमुळे चर्चेत आले आहे. याच एपिसोडमध्ये तालिबानने यावेळी जारी केलेला फर्मान थक्क करणारा आहे. कारण तालिबानची जगात ज्या प्रकारची प्रतिमा आहे, त्यानुसार हा आदेश धक्कादायक आहे.

तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने घराणेशाहीविरोधात फर्मान जारी केला आहे. या आदेशान्वये अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नातेवाईकांना सरकारी पदांवर भरती करण्यापासून रोखण्यात आले आहे.

दरम्यान, तालिबानचा नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याने सर्व तालिबानी अधिकाऱ्यांना त्यांची मुले आणि त्यांच्या प्रशासनात आधीच कार्यरत असलेल्या इतर नातेवाईकांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानी नेत्याच्या या आदेशाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे.

दुसरीकडे, शनिवारी रात्री उशिरा तालिबान (Taliban) सरकारच्या ट्विटर अकाऊंटवर हा आदेश पोस्ट करण्यात आला.

डिक्रीमध्ये म्हटले आहे की, "सर्व अधिकारी आणि मंत्रालये, विभागांमधील स्वतंत्र प्राधिकरणांना आदेश देण्यात आला आहे की कुटुंबातील सदस्यांना किंवा नातेवाईकांना सरकारी पदांवर नियुक्त करण्याची परवानगी नाही."

या ट्विटमध्ये या निर्णयामागे तर्क आहे. अनेक तालिबानी अधिकार्‍यांनी अनुभवी व्यावसायिकांना उच्च पदांवर नियुक्त करण्याऐवजी त्यांच्या मुलांची आणि नातेवाईकांची भरती केल्याची अफवा पसरली आहे.

तसेच, 20 वर्षांनंतर अमेरिकन आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली.

अखुंदजादा यांच्या हुकुमाने सर्व तालिबानी अधिकार्‍यांना त्यांची मुले, कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांऐवजी इतर लोकांसह रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले. तालिबानच्या सर्वोच्च नेतृत्वाबाबत सध्या वाद सुरु आहे. अशा स्थितीत हा आदेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विशेष म्हणजे, तालिबानच्या राजवटीत महिला आणि मुलींच्या विरोधात जारी करण्यात आलेले फर्मान त्यांच्या शिक्षणात अडथळा ठरले आहेत. त्यांनी आपल्या देशात शरिया कायद्याप्रमाणेच अनेक कडक कायदे लागू केले आहेत.

मात्र, घराणेशाहीला आळा घालण्यासाठीचा हा आदेश निश्चितच सकारात्मक आहे. जो वाचून आपल्या देशातील लोकांनाही तो आवडेल.

शिवाय, अन्नटंचाईच्या वेळी भारताने अफगाणिस्तानला गहू पाठवून मदत केली आहे. त्याचबरोबर, तालिबानने भारताला आपल्या भूमीवरुन भारतविरोधातील कोणत्याही दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिला जाणर नाही, असेही सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT