Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानविरोधात कव्हरेज करणं पत्रकारांना पडलं महाग; तालिबान्यांची क्रूरता आली समोर

तालिबान (Taliban) लढाख्यांनी केवळ अनेक पत्रकारांना अटक केली नाही, तर त्यांना कोठडीत ठेवून त्यांच्यावर अत्याचार आणि मारहाण केली.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) राजवटीसाठी पाकिस्तानने (Pakistan) किती मदत केली आहे, याची जगाला चांगलंच माहिती आहे. परंतु अफगाणिस्तानमधील वास्तव दाखवणे तालिबान्यांना व्यर्थ वाटते. त्यामुळे काबूलमध्ये पाकिस्तानविरोधातील निदर्शने थांबवण्यासाठी गोळ्या झाडल्या गेल्या, तर निदर्शनांचे कव्हर करणाऱ्या अफगाण पत्रकारांनाही शिक्षा तालिबान्यांनी दिली आहे. तालिबानने काबूलमध्ये पत्रकारांना क्रूरपणे शिक्षा दिली आहे. तालिबान लढाख्यांनी केवळ अनेक पत्रकारांना अटक केली नाही, तर त्यांना कोठडीत ठेवून त्यांच्यावर अत्याचार आणि मारहाण केली.

अफगाणिस्तान कव्हर करणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे विदारक फोटो शेअर केले, जे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शरीफ हसन यांनी ट्विट केले की, काल काबूलमध्ये दोन पत्रकारांवर अत्याचार करण्यात आले आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

त्याचवेळी लॉस एंजेलिसचे (Los Angeles) पत्रकार मार्कस याम (Marcus Yam) यांनी ट्वीट करुन दावा केला की, तालिबानच्या अत्याचाराला बळी पडलेले हे दोन अफगाण पत्रकार इटीलात्रोझचे रिपोर्टर आहेत, ज्यांची नावे नेमत कॅश आणि टाकी दर्याबी आहेत. महिलांच्या निदर्शनांना कव्हर करताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि तालिबान राजवटीने अमानुषपणे मारहाण केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हॅशटॅग देखील वापरला आहे - पत्रकारिता हा गुन्हा नाही. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका रॅलीला पांगवण्यासाठी तालिबान लढाख्यांनी मंगळवारी गोळीबार केला आणि निदर्शनाचे कव्हर करणाऱ्या अनेक अफगाण पत्रकारांना अटक केली. या फोटोमध्ये, दोन्ही पत्रकार त्यांच्या पाठीवर खोलवर झालेल्या जखमांसह दिसत आहेत जे खूप भयावह आहेत.

अफगाणिस्तानच्या टोलो वृत्तवाहिनीने सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांमध्ये त्याचा कॅमेरामन वाहिद अहमदी देखील आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ओळख गोपनीय ठेवून पत्रकार म्हणाला, "त्यांनी (Taliban) मला जमिनीवर नाक घासण्यास भाग पाडले आणि निषेध लपविण्यासाठी माफीही मागण्यास भाग पाडले. मागितली. ते म्हणाले, "अफगाणिस्तानमध्ये पत्रकारिता करणे कठीण होत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

K Vaikunth Goa Postage Stamp: अभिमान! गोव्याचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांच्यावरील ‘टपाल तिकीट’ जारी

Viral Video: 56व्या 'IFFI'मध्ये 'पुष्पा'ची क्रेझ! 'मै झुकुंगा नहीं साला' म्हणत एन्ट्री, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

'पूजा नाईकने केलेले आरोप... '! कॅश फॉर जॉब प्रकरणी DGP आलोक कुमारांनी दिली माहिती; हस्तक्षेप टाळण्याचे केले आवाहन Video

Goa ZP Election: प्रियोळ ‘झेडपी’वर ‘मगो’चा वरचष्मा! ढवळीकरांची रणनीती आखायला सुरुवात; गावडेंच्या भूमिकेवर लक्ष

Goa: 'वीज मंत्र्यांनी जनतेला स्पष्टीकरण द्यावे'! मीटरच्या नोटिशीवरुन काँग्रेस आक्रमक; अभियंत्यास घेराव घालून विचारला जाब

SCROLL FOR NEXT