Afgan Women Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban: तालिबानचा नवा फर्मान, आता अफगाण महिलांच्या 'या' गोष्टीवरही बंदी

Taliban News: तालिबानने एका नवीन मौखिक आदेशानुसार काबूल आणि देशभरातील इतर प्रांतांमध्ये महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी घातली आहे.

Manish Jadhav

Taliban News: तालिबानने एका नवीन मौखिक आदेशानुसार काबूल आणि देशभरातील इतर प्रांतांमध्ये महिलांच्या ब्युटी सलूनवर बंदी घातली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, तालिबानच्या 'प्रिव्हेंटिंग एव्हिल आणि स्प्रेडिंग वर्च्यू' मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद अकीफ महाजार यांनी टोलो न्यूजला ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने काबूल नगरपालिकेला नवीन आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आणि महिला ब्युटी सलूनचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.

'आपण काय केले पाहिजे'

टोलो न्यूजनुसार, मेकअप आर्टिस्ट रेहान मुबारीझ म्हणाल्या की, 'अफगाण पुरुष बेरोजगार आहेत. जेव्हा पुरुष आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाहीत, तेव्हा स्त्रियांना भाकरी कमवण्यासाठी ब्युटी सलूनमध्ये काम करावे लागते. आम्हाला तिथे जाण्यास बंदी घातली तर आम्ही काय करावे?'

मेकअप आर्टिस्ट मुबारिझ पुढे म्हणाल्या की, 'जर (कुटुंबातील) पुरुषांकडे नोकऱ्या असतील तर आम्ही घराबाहेर पडणार नाही. आम्ही उपाशी रहावे का? काय करावे? आम्ही मरावे अशी तुमची इच्छा आहे.'

काबूलचे रहिवासी अब्दुल खबीर म्हणाले की, “सरकारने (Government) यासाठी एक चौकट तयार करावी. चौकट अशी असावी की, ज्यामध्ये इस्लामचे किंवा देशाचे नुकसान होणार नाही.''

तालिबानने महिलांवर कडक निर्बंध लादले

दुसरीकडे, ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून यूएस आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर, तालिबानने देशातील सत्ता काबीज केली. 1990 च्या दशकातील राजवटीच्या तुलनेत अताचे शासन अधिक उदारमतवादी असेल असे वचन दिले होते.

मात्र, तालिबानने (Taliban) हे आश्वासन पूर्ण न करता महिलांवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. इस्लामिक अमिरातीने मुली आणि महिलांना शाळा, विद्यापीठे आणि एनजीओमध्ये काम करण्यास तसेच पार्क, सिनेमा आणि इतर मनोरंजन क्षेत्र यासारख्या सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यावर बंदी घातली आहे. तालिबानने अफगाण मुली आणि महिलांवर घातलेल्या बंदीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT