Afghanistan: अफगाणिस्तानात तालिबानचा महिलांवर अत्याचार सुरुच आहे. तालिबानने देशातील दोन प्रांतांमध्ये महिलांना ईदच्या उत्सवात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. बगलान आणि तखारमधील महिलांना ईद-उल-फित्रनिमित्त गटा गटाने न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या, अफगाणिस्तानच्या या दोन प्रांतांनाच आतापर्यंतच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी हेरात प्रांतातील तालिबानी अधिकाऱ्यांनी महिलांना सार्वजनिक ठिकाणी अन्न पदार्थ खाण्यास मनाई केली होती.
मौलवींच्या तक्रारीनंतर तालिबान सरकारने हा निर्णय घेतला. अशा ठिकाणी महिला-पुरुषांची गर्दी होऊ लागली असल्याचे मौलवींनी सांगितले होते.
त्याचबरोबर हिजाब परिधान न केल्याने आणि स्त्री-पुरुष एकाच ठिकाणी असल्याने हे निर्बंध घालण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, तालिबानने अफगाण महिलांना संयुक्त राष्ट्रात काम करण्यासही बंदी घातली आहे. मात्र, यापूर्वी तालिबानच्या मुख्य प्रवक्त्याने अफगाणिस्तानमध्ये या जागतिक संघटनेच्या कामात कोणताही अडथळा येत नसल्याचे सांगितले होते.
देशातील तालिबान शासकांनी महिलांवर (Women) बंदी घालण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले होते. याअंतर्गत संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम करणाऱ्या अफगाण महिला कर्मचारी यापुढे तिथे काम करु शकत नाहीत, असे सांगण्यात आले.
कंदाहारमधील तालिबान नेतृत्वाला अहवाल देणाऱ्या देशाच्या गुप्तचर संस्थेने ही बंदी लागू केली आहे.
दुसरीकडे, ईशान्य अफगाणिस्तानमधील (Afghanistan) महिला संचालित रेडिओवर प्रसारण पुन्हा सुरु झाले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात संगीत वाजवण्यासाठी अधिकाऱ्यांनी रेडिओ प्रसारण बंद केले होते. 'सदाई बानोवन' म्हणजे दारी भाषेत 'स्त्रियांचा आवाज'.
त्याची सुरुवात 10 वर्षांपूर्वी देशातील बदख्शान प्रांतात झाली. अफगाणिस्तानमधील हे एकमेव महिला संचालित रेडिओ स्टेशन आहे.
या स्टेशनमध्ये 8 पैकी 6 महिला कर्मचारी आहेत. बदख्शानमधील संचालक मोइझुद्दीन अहमदी म्हणाले की, इस्लामिक अमिरातीच्या कायद्यांचे आणि नियमांचे पालन करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे संगीत प्रसारित करण्यास मनाई केल्यानंतर रेडिओ स्टेशनला पुन्हा प्रसारण सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.
दुसरीकडे, 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानने महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर निर्बंध लादले आहेत.
सहाव्या इयत्तेनंतर मुलींना शाळेत जाण्यास बंदी आहे. गेल्या वर्षी तालिबानने महिलांना विद्यापीठांमध्ये जाण्यास बंदी घातली होती.
उद्यानासारख्या सार्वजनिक ठिकाणी महिला पुरुषाशिवाय जाऊ शकत नाहीत. तालिबानने उचललेल्या या पावलांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार टीका होत आहे. तालिबानच्या निर्णयांचा संयुक्त राष्ट्रांकडून सातत्याने निषेध करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.