Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानी लडाखे करतायेत भूकबळीचा सामना; संयुक्त राष्ट्राची चेतावणी

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची (Afghanisan) आर्थिक स्थिती आता कमालीची खलावली असतानाच तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची स्थापना केली. यातच आता तालिबा सरकारकडून दावा करण्यात येत आहे की, इथली आर्थिक स्थिती कमालीची बिकट झाली आहे. आणि त्याच्यात अधिकच भर म्हणून जागतिक बँक (World Bank) आणि अमेरिका सारख्या परदेशी संस्थांनी अफगाणिस्तानचा निधी गोठवला आहे. अशा परिस्थितीत तालिबान्यांना देश चालवणे खूप कठीण होत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, बहुतेक तालिबान लढाख्यांना कित्येक महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. अनेक देशांनी अफगाणिस्तानमध्ये स्थापन झालेल्या तालिबान सरकारला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

अफगाणिस्तानमधील आर्थिक संकट

अफगाणिस्तान एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे देशात आर्थिक बेरोजगारी कमालीची वाढली आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर परदेशातून येणारी मदत बंद झाली. आयएमएफ (IMF) आणि जागतिक बँकेनेही तालिबानला मिळत असलेल्या कर्जावर स्थगिती आणली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेचा चलन साठा 9.4 अब्ज डॉलर रोखला आहे. तसेच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) आपल्या 39 सदस्य देशांना तालिबानची मालमत्ता रोखण्यास सांगितले आहे. अशा वेळी अफगाणिस्तानात दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. संयुक्त राष्ट्राने चेतावणी दिली आहे की, अफगाणिस्तानची 97% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकते. तालिबानच्या आगमनापूर्वीच देशातील 72% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती.

तालिबान लढाख्यांची वाईट अवस्था

न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे की, देशातील प्रमुख शहरांबाहेरील तालिबानी लढाख्यांना अन्नासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही. तालिबानकडे त्यांच्या सैनिकांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. तालिबानी लढाख्यांना स्थानिक अफगाण नागरिक अन्न पुरवत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

निश्चित पैसे काढण्याची मर्यादा

तालिबानने अफगाण नागरिकांवर $ 200 काढण्याची मर्यादा घातली आहे, तसेच जे शहरामध्ये येण्यासाठी प्रवास करणाऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी तासन् तास रांगेत उभे रहावे लागत आहे. तालिबान्यांनी अफगाण सत्ता ताब्यात घेतल्यापासून अनेक बँका बंद झाल्या आहेत.

अन्नाचे संकट अधिक गडद होईल, कुपोषणाच्या मृत्यूचे प्रमाण वाढेल

त्याच वेळी, संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की 40 दशलक्ष अफगाणींना खाद्य आपातकाळाचा’ चा सामना करावा लागत आहे. बहुतेक अफगाण जनता ग्रामीण भागात राहते, जेथे येणाऱ्या महिन्यांमध्ये गव्हाची लागवड, पशुधनासाठी चारा आणि रोख मदत सुनिश्चित करण्यासाठी $ 36 दशलक्षची गरज आहे. विशेषतः असुरक्षित कुटुंबे, वृद्ध आणि अपंगांना त्वरित मदतीची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या फूड एंड एग्रीकल्चर इमरजेंसी प्रमुख रेन पॉलसन म्हणाले की, येणाऱ्या काळात अफगाणिस्तानमध्ये जी आर्थिक समस्येचा सामना करणे जास्त कठीण होणार आहे. मोठ्या संख्येने लोक कुपोषणाच्या दिशेने वाटचाल करतील. मृत्यू दरात देखील मोठी होईल असं त्यांनी यावेळी सुचवलं आहे. सोमवारी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानच्या लोकांना एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मानवी मदत देण्याचे वचन दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पिराचीकोंड-डिचोली येथील बेकायदेशीर झोपडपट्टी हटविण्यास सुरुवात, परिसरात तणाव

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

SCROLL FOR NEXT