'Taliban' crisis, important meeting of foreign ministers in Afghanistan Twitter @Ani
ग्लोबल

'तालिबानी' संकट, अफगाणिस्तानात परराष्ट्रमंत्र्यांची महत्वाची बैठक

या बैठकीत अफगाणिस्तानात(Afghanistan) तालिबानची वाढती ताकद आणि भविष्यातील आव्हानांबद्दल जयशंकर यांना अटमार यांनी सविस्तर माहिती दिली असल्याचे समजते.

Dainik Gomantak

अफगाणिस्तानात (Afghanistan) सत्ता ताब्यात घेण्याच्या तालिबान्यांनी(Taliban) केलेल्या प्रयत्नांमुळे सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत(India) आणि अफगाणच्या परराष्ट्र (Minister of External Affairs) मंत्र्यांमधील एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी आपले अफगाणिस्तानचे समकक्ष मोहम्मद हनीफ आत्मार यांची भेट घेऊन युद्धग्रस्त देशातील परिस्थितीविषयी चर्चा केली आहे.

या बैठकीत अफगाणिस्तानात तालिबानची वाढती ताकद आणि भविष्यातील आव्हानांबद्दल जयशंकर यांना अटमार यांनी सविस्तर माहिती दिली असल्याचे समजते.याचबरोबर जयशंकर यांनी स्वतंत्रपणे उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अबुल अजीज कामिलोव्ह यांचीही भेट घेऊन अफगाण विषयावर चर्चा केली असल्याचे समजते आहे.

शांघाय सहकार संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या आणि अफगाणिस्तानावरील एससीओ संपर्क गटाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जयशंकर मंगळवारी ताजिकिस्तानच्या राजधानीत दाखल झाले आहेत आणि या बैठकीत या विविध देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत माहिती दिली की, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हनिफ आत्मार यांच्याशी भेट घेऊन आपल्या दुशेंबे भेटीची सुरुवात केली. आम्ही उद्या अफगाणिस्तानावरील एससीओ संपर्क समूहाच्या बैठकीची अपेक्षा करतो.

तसेच ही बाब ही उल्लेखनीय आहे की अफगाणिस्तानावरील एससीओ संपर्क गटाची बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा संपूर्ण जगाला तालिबानच्या उदय आणि संभाव्य रक्तपात बद्दल भीती आहे.

विशेष म्हणजे अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार घेतल्यानंतर भारतासह जगभरातील तालिबानी राजवटीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तालिबान-पाकिस्तान-चीन त्रिकुट एक मोठे संकट होऊ शकते अशी चिंता भारतात आहे. या त्रिकुटामुळे अफगाणिस्तानात भारताच्या सुरक्षा आणि भारतीय गुंतवणूकीचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.

याचमुळे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या बैठकीला अन्यसाधारण महत्व असल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT