तालिबानचा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा !

विशेष म्हणजे अफगाणिस्तानातून(Afghanistan) अमेरिकेची माघार घेतल्यानंतर भारतासह जगभरातील तालिबानी राजवटीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे
Taliban sternly warns Pakistan Afghanistan
Taliban sternly warns Pakistan Afghanistan Dainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानात(Afghanistan) तालिबानांच्या वर्चस्वामुळे पाकिस्तानला(Pakistan) मोठा फटका बसला आहे. अफगाणिस्तानात मनमानीची स्वप्नं पाहणार्‍या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, भारताच्या मुत्सद्दी पुढाकाराने एक नवीन वळण मिळत आहे. (Tehrik-i-Taliban Pakistan)

तहरीक-ए-तालिबानच्या(Taliban) या विधानाने भारताच्या काही चिंता कमी होतील हे मात्र नक्की. तालिबान्यांनी भारताने तटस्थ राहण्याची अपेक्षा व्यक्त केली असून अफगाणिस्तानातील जनतेला अपील केले आणि कोणत्याही लादलेल्या सरकारला आवाहन केले नाही. तालिबान म्हणाले की, आम्हाला आशा आहे की तालिबान आणि अफगाणिस्तानमधील संघर्षात भारत निपक्ष राहील.

Taliban sternly warns Pakistan Afghanistan
'भारताला अफगाणिस्तानातून पळून जाण्याशिवाय पर्याय नाही'- पाकिस्तानी मंत्री

तेहरीक-ए-तालिबान अफगाणिस्तानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी पाकिस्तान आमच्यावर हुकूमशाही चालवू शकत नाही किंवा तालिबानांवर आपले मत थोपवू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगत इशाराच दिला आहे. शाहीन यांनी या प्रकरणात भारताकडून निपक्ष राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानबरोबर आपली मनमानी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला सुहेलच्या या वक्तव्याचा धक्काच बसला आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान जेव्हा सुहेल यांना विचारले गेले होते की तालिबानने पाकिस्तानचे म्हणणे ऐकायचे नाही का. यावर ते म्हणाले की आम्हाला आपापसात बंधुतेचे नाते हवे असून शांतता प्रक्रियेत पाकिस्तान आम्हाला मदत करू शकतो, परंतु आमच्यावर हुकूमशाही चालवू शकत नाही. ते म्हणाले की, पाकिस्तान आमच्यावर कोणतेही मत थोपवू शकत नाही. ते आंतरराष्ट्रीय तत्त्वांच्या विरोधात आहे.

यावेळी तेहरीक-ए-तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तनला खडसावून सांगितले की अफगाणिस्ताची माती वापरण्याची परवानगी कोणत्याही व्यक्ती वा संघटनेला दिली जाणार नाही. तेहरीक-ए-तालिबानने सांगितले की इस्लामिक अमीरातचे एकच धोरण आहे.तालिबानचे हे विधान विशेष आहे कारण तालिबान अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसमवेत युद्ध लढा देत असल्याचा दावाही एका अहवालात करण्यात आला आहे.या अहवालानुसार पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तहेर संस्था तालिबानसह अफगाणिस्तानातही सक्रिय आहेत आणि त्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देत आहेत. असाच प्रश्न अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांनी विचारला होता की तालिबान युद्ध देशासाठी आहे की काही बाहेरील व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालू आहे.

Taliban sternly warns Pakistan Afghanistan
Iraq: कोविड रुग्णालयाला भीषण आग, अनेक रुग्णांचा मृत्यू

तालिबानच्या प्रवक्त्याने भारताच्या प्रतिनिधींसोबतची बैठक नाकारली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी कतारच्या खास राजदूताने असा दावा केला होता की भारतीय अधिकारी दोहामध्ये तालिबान प्रतिनिधींना भेटले आहेत.त्याने तालिबान आणि अफगाणिस्तानमधील संघर्षात भारत तटस्थ राहण्याची आशा व्यक्त केली. भारत कोणत्याही दबावाखाली येणार नाही. अफगाणिस्तान सरकारकडे लक्ष वेधत ते म्हणाले की सरकारे ये-जा करत असतात आणि विद्यमान सरकार बळजबरीने आले आहे.त्यामुळे भारताने निपक्ष राहावे.

विशेष म्हणजे अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार घेतल्यानंतर भारतासह जगभरातील तालिबानी राजवटीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तालिबान-पाकिस्तान-चीन त्रिकुट एक मोठे संकट होऊ शकते अशी चिंता भारतात आहे. या त्रिकुटामुळे अफगाणिस्तानात भारताच्या सुरक्षा आणि भारतीय गुंतवणूकीचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com