Ajmal Haqiqi Twitter
ग्लोबल

कुराणाचे पठण करताना हसला अन्..., अफगाण मॉडेलला तालिबानने केली अटक

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून नागरिकांवर प्रचंड निर्बंध लादले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Taliban On Disrespecting Islam: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान राजवट आल्यापासून नागरिकांवर प्रचंड निर्बंध लादले जात आहेत. अशातच याट निर्बंधांच्या आधारे तालिबानने अफगाण मॉडेल आणि YouTuber अजमल हकीकी (Ajmal Haqiqi) आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. त्याच्यावर इस्लाम आणि कुराणचा अनादर केल्याचा आरोप आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही मानवाधिकारांची वकिली करणाऱ्या एनजीओने म्हटले आहे की, काबुलमधील (Kabul) एका सोशल मीडियाने गेल्या आठवड्यात त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या इतर तीन साथीदारांसह कुरआनच्या आयतींचा मजेशीर पद्धतीने वापर करताना दिसला होता.

कुराणाच्या श्लोकांचे पठण करताना हसणे

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये, अजमल हकीकी आपल्या सहकाऱ्याच्या विनोदी शैलीवर हसताना दिसला, जो अरबी भाषेत कुराणातील आयते वाचताना दिसत होता. यानंतर, 5 जून रोजी अजमल हकीकी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्या वागणुकीबद्दल माफी मागताना दिसला.

7 जून रोजी अटक

इस्लामिक पवित्र मूल्यांचा अपमान केल्याबद्दल अजमल हकीकी आणि इतर तीन साथीदारांना तालिबानच्या गुप्तचर महासंचालनालयाने 7 जून रोजी अटक केल्याचे एनजीओकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ रिलीज झाला, ज्यामध्ये हकीकी पुन्हा एकदा इस्लामचा अपमान केल्याबद्दल माफी मागताना दिसला.

एनजीओने सुटकेची मागणी केली

सध्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनल एनजीओ सतत तालिबानला अफगाण मॉडेल अजमल हकीकी आणि त्याच्या इतर साथीदारांना सोडण्यास सांगत आहे. यासह एनजीओचे म्हणणे आहे की तालिबानने त्यांचे मत मुक्तपणे मांडू इच्छिणाऱ्यांची सेन्सॉरशिप रद्द करावी. पण त्यांना सोडून द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT