Missiles Dainik Gomantak
ग्लोबल

China Taiwan Conflict: चीनला ठेचण्यासाठी तैवानचं मोठं डील, अमेरिकेला दिली 400 क्षेपणास्त्रांची ऑर्डर!

China Taiwan Conflict: शेजारील चीनकडून होणारा संभाव्य हल्ला लक्षात घेऊन तैवानने तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

China Taiwan Conflict: चीनकडून होणारा संभाव्य हल्ला लक्षात घेऊन तैवानने तयारी सुरु केली आहे. स्वतःचे सैन्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तैवान लवकरच अमेरिकेकडून घातक शस्त्रे खरेदी करणार आहे.

चीनच्या संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने तैवान 400 हून अधिक हार्पून क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे.

दरम्यान, या खरेदी कराराला 2020 मध्ये संसदेने मंजुरी दिली होती. याबाबतची माहिती व्यापारी गटाचे नेते आणि या विषयाशी परिचित असलेल्या लोकांनी दिली.

ते म्हणाले की, तैवान हार्पून लँड अॅटॅक क्षेपणास्त्र खरेदी करेल.

$1.7 अब्ज करार

आता, यूएस नेव्ही एअर सिस्टम कमांडने तैवानच्या (Taiwan) वतीने बोईंगला करार जारी केला आहे. यूएस-तैवान बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष रुपर्ट हॅमंड-चेंबर्स यांच्या मते, जमिनीवरुन रिमोटने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी तैवानकडून हा पहिलाच करार आहे.

व्यापार अधिकाऱ्यासह या कराराशी परिचित असलेल्या इतर तीन लोकांनीही करार तैवानसाठी असल्याची पुष्टी केली. पेंटागॉनने 7 एप्रिल रोजी बोईंगसोबत $1.7 बिलियन कराराची घोषणा केली. पण त्यात तैवानचा खरेदीदार म्हणून उल्लेख नाही.

हार्पून क्षेपणास्त्र विशेष का आहे?

हार्पून क्षेपणास्त्र ही अमेरिकेची जगप्रसिद्ध जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. हार्पून क्षेपणास्त्र पहिल्यांदा 1977 मध्ये तैनात करण्यात आले होते.

हे सर्व हवामानात मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे ते समुद्राच्या अगदी कमी उंचीवर उडू शकते.

अमेरिका आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे

हा करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चीन सातत्याने तैवानवर दावा करत आला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियामध्ये तैवानच्या अध्यक्षांनी यूएस हाऊसचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांची भेट घेतली.

या बैठकीनंतर चीनने (China) तैवानभोवती लष्करी सराव केला. येथे, अमेरिकन संरक्षण विभागाचे प्रवक्ते आर्मी लेफ्टनंट कर्नल मार्टिन मेनर्स यांनी तैवानकडून हार्पून क्षेपणास्त्रांच्या खरेदीसंदर्भात माहिती देण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

SCROLL FOR NEXT