Taiwan President Tsai Ing-wen Dainik Gomantak
ग्लोबल

Taiwan National Day: 'चीनपुढे आम्ही झुकणार नाही'...

तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन (Tsai Ing-wen) म्हणाल्या, ''चीनने ठरवलेल्या मार्गावर आपण चालणार नाही. चिनी मार्ग स्वातंत्र्य किंवा लोकशाही प्रधान करत​ नाही.''

दैनिक गोमन्तक

तिबेट आणि तैवान (Taiwan) आपल्या देशाचा अविभाज्य भाग असल्याचे चीन (China) सातत्याने सांगत आला आहे. यामध्ये तैवान मात्र आपला चीनशी काही एक संबंध नसल्याचे सांगत आहे. याच पाश्वभूमीवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान तैवान आज आपला 'राष्ट्रीय दिन' (National Day) साजरा करत आहे. यावेळी तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन (Tsai Ing-wen) म्हणाल्या, ''चीनने ठरवलेल्या मार्गावर आपण चालणार नाही. चिनी मार्ग स्वातंत्र्य किंवा लोकशाही प्रधान करत​ नाही.'' दुसरीकडे मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी एक दिवस आधी, तैवान शांततेने चीनचा भाग बनले असा संकल्प व्यक्त केला होता. परंतु त्यांनी बळाचा वापर केल्याचा थेट उल्लेख यावेळी केला नाही. मात्र, जिनपिंग यांच्या या प्रतिक्रियेनंतर तैवानने कठोर भूमिका घेतली. तैवानने सांगितले की, आमचे लोकच तैवानचे भविष्य ठरवतील. राष्ट्रीय दिनाच्या रॅलीला संबोधित करताना त्साई म्हणाल्या की, ''आम्हाला सामुद्रधुनीतील तणाव कमी होण्याची आशा आहे, मात्र तैवान याबाबत कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही.'' मध्य तैपेईमधील अध्यक्षीय कार्यालयाबाहेर केलेल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या, तैवानचे नागरिक चीनच्या दबावापुढे झुकणार नाहीत. आम्ही आमचे राष्ट्रीय संरक्षण बळकट करत राहू.

तैवानचे राष्ट्रपती काय म्हणाले?

तैवानचे अध्यक्षा पुढे म्हणाल्या, ''तैवान चीनने ठरवलेल्या मार्गावर चालणार नाही. तसेच चीनच्या दबावापुढे झुकणारही नाही. चीनचा जो मार्ग तैवानसाठी मुक्त स्वातंत्र्य आणि लोकशाही मार्ग प्रदान करत नाही किंवा आमच्या 23 दशलक्ष लोकांसाठी सार्वभौमत्व बहाल करत नाही.'' वास्तविक, चीन तैवानला (China-Taiwan Relations) आपला भाग मानतो आणि बीजिंगचे म्हणणे आहे की, बळाच्या जोरावर आपल्या देशाचा भाग बनवू शकतो.

राष्ट्रीय दिवस का साजरा केला जातो?

तैवानचा राष्ट्रीय दिवस (Taiwan National Day) 'डबल टेन' किंवा 'डबल टेन्थ डे' म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा केला जातो. 1911 चे वुचांग बंड आठवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे चीनी गणराज्याची निर्मीती झाली होती. तथापि चिनी गृहयुद्धानंतर, चीन प्रजासत्ताकाचे नियंत्रण कम्युनिस्ट नेत्यांच्या ताब्यात देण्यास भाग पाडण्यात आले आणि तत्कालीन अधिकारी 1949 मध्ये तैवानला पळून गेले. परेड, रॅली, मार्शल आर्ट, लोकनृत्य आणि इतर सांस्कृतिक उपक्रम दरवर्षी तैपेई येथील प्रेसिडेंट स्क्वेअर येथे केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT