Sweden Officially Joins Nato Military Alliance
Sweden Officially Joins Nato Military Alliance Dainik Gomantak
ग्लोबल

Sweden Officially Joins Nato Military Alliance: स्वीडन बनला अधिकृतरित्या नाटोचा 32 वा सदस्य

Manish Jadhav

Sweden Officially Joins Nato Military Alliance: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं घनघोर युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये. रशियाच्या युक्रेनवर 2022 च्या आक्रमणानंतर युरोपमधील रशियन आक्रमणाविषयी चिंता वाढली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वीडन गुरुवारी अधिकृतरित्या नाटो संघटनेत 32 वा सदस्य म्हणून सामील झाला. यासोबतच स्वीडनची 200 वर्षे जुनी अलाइनमेंटही संपुष्टात आली आहे. नाटोची रचना प्रामुख्याने रशियाच्या विरोधात आहे. स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी गुरुवारी नाटोमध्ये आपल्या देशाच्या प्रवेशाला "स्वातंत्र्याचा विजय" म्हटले. “आजचे हे सदस्यत्व म्हणजे स्वातंत्र्याचा विजय आहे”, असे त्यांनी वॉशिंग्टन येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्यासमवेत एका कार्यक्रमात म्हटले. "स्वीडनने नाटोमध्ये सामील होण्यासाठी स्वातंत्र्य, लोकशाही आणि सार्वभौमत्वाची निवड केली आहे," असेही ते पुढे म्हणाले.

स्वीडनला नाटोच्या 5 व्या कलमानुसार संरक्षण मिळाले

"हा एक ऐतिहासिक दिवस आहे. स्वीडन आता नाटोची धोरणे आणि निर्णयांना आकार देण्यासाठी समान भागीदार म्हणून काम करेल," असे नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले. "200 वर्षांहून अधिक अलाइनमेंटनंतर, स्वीडनला आता कलम 5 अंतर्गत प्रदान करण्यात आलेले संरक्षण, मित्र राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची आणि सुरक्षिततेची अंतिम हमी आहे," असेही ते पुढे म्हणाले. नाटोचे कलम 5 हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ज्यातर्गंत, कोणत्याही नाटो देशावरील हल्ल्याला इतर सदस्य देशांवरील हल्ला म्हणून पाहिले जाते.

कोणते देश नाटोचे सदस्य आहेत?

यूके, यूएस, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि तुर्कीसह संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेत नाटोचे 31 सदस्य आहेत. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर, अनेक पूर्व युरोपीय देश सामील झाले: अल्बेनिया, बल्गेरिया, हंगेरी, पोलंड, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, रोमानिया, लिथुआनिया, लातविया आणि एस्टोनिया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT