Yemen  dainik gomantak
ग्लोबल

Saudi-led coalition announces Yemen ceasefire : सौदी थांबवणार रमजानच्या काळात येमेनमधील लष्करी कारवाया

पवित्र रमजान महिन्यात युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक

रियाद : येमेनमधील हौथी गटाशी लढा देत असलेल्या सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने, संयुक्त राष्ट्रांनी मुस्लिमांसाठी पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्यात युद्धबंदीच्या आवाहन केले होते. त्याप्रमाणे रमजानच्या महिन्यात आम्ही राजकीय संवाद आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी लष्करी कारवाया स्थगित करत असल्याचे म्हटले आहे. मात्र हौथी बंडखोरांनी युद्धविरामाचा प्रस्ताव नाकारला आहे. (suspend military operations in Yemen during the Muslim fasting month of Ramadan : Saudi-led coalition)

सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी युतीने मंगळवारी सांगितले की, युद्धाच्या संकटावर राजकीय तोडगा काढण्याच्या प्रयत्नात येमेनमधील लष्करी कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, इराणचा (Iran) पाठिंबा असलेल्या बंडखोर हौथींनी, येमेनची (Yemen) बंदरे आणि विमानतळे पूर्णपणे न उघडता युतीच्या आवाहनाला “अर्थहीन” म्हटले आहे.

दरम्यान रमजानच्या पवित्र महिन्यात युद्धविराम व्हावे असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले होते. रमजान महिना २ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर सौदी राज्य वृत्तसंस्था एसपीएने युतीचे अधिकृत प्रवक्ते, ब्रिगेडियर जनरल तुर्की अल-मल्की यांच्या विधानाचा हवाला देत म्हटले आहे की, युती येमेनमध्ये बुधवारी सकाळी 6 वाजता सुरू होणारी लष्करी कारवाई (Military action) स्थगित करत आहे. तसेच येमेनच्या संघर्षावर सर्वसमावेशक, शाश्वत तोडगा काढण्यासाठी आणि येमेनच्या बंधू राष्ट्रामध्ये सुरक्षा आणि स्थिरता प्राप्त करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यासह त्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तसेच त्यांनी, युतीची संयुक्त सेना कमांड या युद्धविरामाचे (War) पालन करेल आणि त्याचे यश सुनिश्चित करण्यासाठी आणि शांतता (peace) प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्यात युद्ध समाप्तीसाठी चर्चेचेसह अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. त्याचबरोबर योग्य प्रक्रियाही हाती घेण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT