Romanchenko Dainik Gomantak
ग्लोबल

हिटलर पासून वाचले, मात्र पुतीनने मारले

खार्किव येथे शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 96 वर्षीय बोरिस रोमचेन्को यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. युक्रेनमधील खार्किव येथे शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 96 वर्षीय बोरिस रोमचेन्को यांचा मृत्यू झाला. नाझी छावणीत (होलोकॉस्ट) ज्यूंच्या हत्याकांडातून वाचून रोमचेन्को युक्रेनला परतले होते. शुक्रवारी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

बुचेनवाल्ड कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मेमोरियल इन्स्टिट्यूटने देखील रोमचेन्कोच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. संस्थेने म्हटले आहे की, द्वितीय विश्वयुद्धात रोमचेन्को बुचेनवाल्ड, पीनेम्युंडे, डोरा आणि बर्गन-बेलसेन कॅम्पमध्ये जिवंत राहिले. रोमाचेन्को यांच्या मृत्यूच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. रोमचेन्को इतरांना नाझींनी केलेल्या अत्याचारांची माहिती देत ​​असे.

बोरिस रोमचेन्कोची नात युलिया रोमचेन्को यांनी सीएनएनला सांगितले की, 18 मार्च रोजी साल्टिवका येथे गोळीबार झाल्याची बातमी आली होती. यानंतर त्यांनी स्थानिक लोकांना आजोबांच्या घराबद्दल विचारणा केली. स्थानिकांनी जळणाऱ्या घराचा व्हिडिओ (Video) आम्हाला पाठवला.

ती पुढे म्हणाली, साल्टिव्हकामध्ये कर्फ्यू होता, त्यामुळे ती तिथे लवकर जाऊ शकले नाही. तिथे पोहचल्यावर मी पाहिले की माझ्या आजोबांचे घर (House) पूर्णपणे जळाले आहे. घरात ना खिडक्या होत्या ना बाल्कनी, काहीच उरले नव्हते. शुक्रवारी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT