Sudan Civil War Dainik Gomantak
ग्लोबल

Sudan Civil War: सुदानमध्ये वाढली अराजकता, 5 लाख लोकांनी सोडला देश सोडला; 'या' देशाला बनवलयं आश्रयस्थान

Sudan Civil War: एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरकीडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने हाहाकार माजवला आहे.

Manish Jadhav

Sudan Civil War: एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरकीडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने हाहाकार माजवला आहे. यातच, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुदानमध्ये गृहयुद्ध सुरु झाल्यापासून परिस्थिती इतकी बिघडली आहे की सुदानी लोकांवर पलायन करण्याची वेळ आली आहे. इजिप्तमध्ये सुमारे 5 लाख लोकांनी संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे सुदानी लोकांसाठी इजिप्शियन व्हिसा नियम सख्त करण्यात आले आहेत. “आपल्याला सुदानकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही,” असे संयुक्त राष्ट्रांचे सहायता प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी या महिन्यात सांगितले. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की, दररोज अंदाजे 1,500 लोकांना सुदानमधून दक्षिण सुदानला पळून जाण्यास भाग पाडले जाते.

युद्धाचे कारण काय आहे

दरम्यान, 15 एप्रिल 2023 रोजी सुदानी सशस्त्र दलाचे प्रमुख अब्देल फताह अल-बुरहान आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसचे कमांडर, त्यांचे माजी डेप्युटी मोहम्मद हमदान डागलो यांच्यात सत्तेसाठी लढाई सुरु झाली. ज्याची किमत संपूर्ण देश चुकवत आहे. 45.7 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश युद्धामुळे जवळपास खाली झाला आहे.

किती लोक देश सोडून पळून गेले

आकडेवारीनुसार, सुदानमध्ये (RSF) आणि (SAF) यांच्यातील संघर्ष सुरु झाल्यापासून आठ दशलक्षाहून अधिक लोकांनी आपला देश सोडला आहे. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की, दररोज अंदाजे 1,500 लोकांना सुदानमधून दक्षिण सुदानला पळून जाण्यास भाग पाडले जाते. त्यापैकी पाच दशलक्ष मुले आहेत, तर 2.1 दशलक्ष पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. वृद्ध, महिला आणि मुले सुदानमधून ट्रकमधून दक्षिण सुदानच्या दिशेने जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते, सुदानमधील अंदाजे 560,000 लोकांनी दक्षिण सुदानमध्ये आश्रय घेतला आहे. आता इजिप्तमध्ये आश्रय घेण्यासाठी 5 लाखांहून अधिक लोकांनी संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेकडे नोंदणी केली आहे.

किती लोक मरण पावले

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून सुदानमध्ये सुमारे 14,000 लोक मारले गेल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. गेल्या महिन्यात यूएनच्या लीक झालेल्या अहवालात गेल्या वर्षी तीन महिन्यांत पश्चिम दारफुरमधील एल जेनिना शहरात सुमारे 10,000 ते 15,000 लोक मारले गेले.

युक्रेन आणि गाझा पेक्षाही वाईट परिस्थिती

गाझा आणि युक्रेनमधील युद्धावर सारे जग बारकाईने लक्ष ठेवून असताना सुदानमधील परिस्थिती युक्रेन-गाझापेक्षाही भयानक होत चालली आहे. “आपल्याला सुदानकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही,” असे संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी या महिन्यात सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या युद्धात हजारो नागरिक मारले गेले. युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे की सुमारे 25 दशलक्ष लोकांना, सुदानच्या लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकांना मानवतावादी मदतीची आवश्यकता आहे, तर देशातील अंदाजे 3.8 दशलक्ष पाच वर्षांखालील मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT