South Sudan: दक्षिण सुदानमध्ये नरसंहार, अबेईमध्ये संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकासह 52 जाणांची हत्या

Sudan: स्वातंत्र्यापूर्वीच 1955 मध्ये उत्तर आणि दक्षिण सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. हे गृहयुद्ध 1955 ते 1972 म्हणजे 17 वर्षे चालले. यामध्ये पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
52 killed including UN peacekeeper in Abyei, South Sudan.
52 killed including UN peacekeeper in Abyei, South Sudan.
Published on
Updated on

Genocide in South Sudan, 52 killed including UN peacekeeper in Abyei:

सुदान आणि दक्षिण सुदान या दोन्ही देशांनी दावा केलेला तेल समृद्ध प्रदेश अबेई येथील गावकऱ्यांवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे, ज्यात संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकासह 52 लोक ठार झाले आहेत आणि 64 जखमी झाले आहेत.

सध्या अबेई प्रदेश दक्षिण सुदानच्या ताब्यात आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

युनायटेड नेशन्स इंटरिम सिक्युरिटी फोर्स फॉर अबेई (UNISFA) ने हिंसाचाराचा निषेध केला आहे. UNIFSA ने हिंसाचारात आपल्या एका शांतता सैनिकाच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांप्रदायिक हिंसाचारामुळे अनेक बळी गेल्याचे सांगितले.

निवेदनात म्हटले आहे की, सशस्त्र गटाने अबेई येथील UNIFSA तळावर हल्ला केला. मात्र मिशनने हल्ला परतवून लावला, परंतु दुःखदपणे एक शांततारक्षक ठार झाला.

52 killed including UN peacekeeper in Abyei, South Sudan.
Attack On US Army In Syria: जॉर्डननंतर आता सीरियातही अमेरिकन सैन्यावर रॉकेट हल्ला

अबेई प्रदेशात वांशिक हिंसाचार सामान्य आहे. येथील आदिवासी गटांमध्ये जमिनीचा वाद सुरू आहे. प्रदेशातील बहुसंख्य Ngok Dinka समुदाय दक्षिण सुदानच्या बाजूने आहे, तर मिसेरिया भटके सुदान समर्थक मानले जातात.

दक्षिण सुदानने गेल्या वर्षी मार्चमध्ये अबेई येथे आपले सैन्य तैनात केल्यानंतर सांप्रदायिक आणि सीमापार संघर्ष वाढला आहे. आफ्रिकन युनियनने अबेईवर सार्वमत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु कोणताही परिणाम झाला नाही. मतदानात कोणी भाग घेतला याबाबत मतभिन्नता होती.

52 killed including UN peacekeeper in Abyei, South Sudan.
Taliban Meeting: तालिबानने बोलावलेल्या बैठकीत भारताचा सहभाग, रशियासह इतर दहा देशांनी लावली हजेरी

गृहयुद्धाचा इतिहास

सुदानवर इजिप्त आणि ब्रिटनचे राज्य होते. 1952 मध्ये येथे स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले. यानंतर सुदानला 1956 मध्येच स्वातंत्र्य मिळाले. तथापि, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दक्षिण सुदानचे लोक फारसे खुष नव्हते. अधिक स्वायत्तता देण्याची त्यांची मागणी होती, जी स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू होती.

परिणाम असा झाला की, स्वातंत्र्यापूर्वीच 1955 मध्ये उत्तर आणि दक्षिण सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. हे गृहयुद्ध 1955 ते 1972 म्हणजे 17 वर्षे चालले. यामध्ये पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 1972 मध्ये शांतता करारानंतर हे गृहयुद्ध संपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com