वादळामुळे सर्व विध्वंस

 

Dainik Gomantak

ग्लोबल

फिलीपिन्समध्ये या वर्षातील सर्वात शक्तिशाली 'राय' वादळ

ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी लोक येथे येतात, मात्र वादळामुळे त्यांना अन्नपाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

फिलीपिन्समध्ये या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ (Storm) रायने मोठा विध्वंस केला आहे. त्यामुळे आतापर्यंत 208 जणांचा मृत्यू झाला आहे. किमान 239 लोक जखमी आणि 52 बेपत्ता आहेत. पोलिसांनी (police) सांगितले की, चक्रीवादळ रायने द्वीपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य भागात उद्ध्वस्त केले आहे.

वादळाचा तडाखा बसल्यानंतर 300,000 हून अधिक लोकांना आपली घरे सोडावी लागली. तसेच, समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट्स रिकामी करण्यात आले आहेत. फिलीपीन्स (Philippines) रेड क्रॉसने म्हटले आहे की, किनारी भाग पूर्णपणे ओसाड झाला आहे.

रेडक्रॉसचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन (Richard Gordon) म्हणाले होते, 'घरे, रुग्णालये, शाळा आणि समुदायाच्या इमारती खराब झाल्या आहेत.' लाकडी घरांचे तुकडे झाले आणि गावांना पूर आला. राई चक्रीवादळाची तुलना 2013 मधील हैयान चक्रीवादळाशी केली जात आहे. फिलीपिन्समधील योलांडा नावाचे हैयान हे देशातील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक वादळ मानले जाते. ज्यामध्ये 7,300 हून अधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले

बोहोल बेटाला सर्वाधिक फटका

प्रांतीय गव्हर्नर (Governor) आर्थर याप यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितले की, यावेळी सर्वाधिक प्रभावित बेटांपैकी एक म्हणजे बोहोल. जो समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. येथे किमान 74 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिरगाव, दिनागट आणि मिंडानाओ या बेटांवरही मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. वादळामुळे ताशी 195 किलोमीटर (120 मैल) वेगाने वाऱ्याचा वेग आला. प्रांतीय माहिती अधिकारी जेफ्री क्रिसोस्टोमो यांनी रविवारी AFP ला सांगितले की दिनागट बेटांवर किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ख्रिसमसच्या वेळी शोक

सियारगाव बेटावरील जनरल लुना या लोकप्रिय पर्यटन शहरामध्येही परिस्थिती वाईट आहे. ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी लोक येथे येतात, मात्र आता त्यांना अन्नपाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. अनेक भागात दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वादळामुळे झालेल्या एकूण नुकसानीचा अंदाज घेणे आपत्ती यंत्रणांना कठीण जात आहे. घरातील वीज गेली आहे. शोध आणि बचावासाठी हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. अन्न, पाणी आणि वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारी तटरक्षक दल आणि नौदलाची जहाजे रवाना करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT