"Strong Indo-US ties needed to achieve 'independence' from China," says American politician Vivek Ramaswamy. Dainik Gomantak
ग्लोबल

"चीनपासून 'स्वातंत्र्य' मिळवण्यासाठी भक्कम भारत-अमेरिका संबंधांची गरज," अमेरिकन नेत्याची मोदींना साद

'अमेरिकेने अंदमान आणि निकोबारमध्येही भारतासोबत लष्करी संबंध मजबूत करावेत जेणेकरून गरज पडल्यास मलाक्का स्टेटमध्ये चीनला रोखता येईल.'

Ashutosh Masgaunde

"Strong Indo-US ties needed to achieve 'independence' from China," says American politician Vivek Ramaswamy:

अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला दावा सांगणारे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी म्हणतात की, भारत आणि अमेरिकेतील मजबूत संबंध अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व संपवू शकतात.

विवेक रामास्वामी हे देखील अमेरिकेचे भारतासोबतचे सामरिक संबंध मजबूत करण्याचे समर्थक आहेत. विवेक रामास्वामी सध्या त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

आयोवा येथील माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विवेक रामास्वामी म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व संपुष्टात आणू शकतात. अमेरिका आता आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे, पण भारताशी संबंध दृढ करून अमेरिका चीनवरील अवलंबीयत्व संपवू शकतो.

'अंदमानात लष्करी संबंध मजबूत करण्याची गरज'

रामास्वामी म्हणाले की, 'अमेरिकेने अंदमान आणि निकोबारमध्येही भारतासोबत लष्करी संबंध मजबूत करावेत जेणेकरून गरज पडल्यास मलाक्का सामुद्रधुनीत चीनला रोखता येईल.'

मध्यपूर्वेतील देशांकडून तेल खरेदी करणाऱ्या चीनची जहाजे मलाक्का सामुद्रधुनीतूनच जातात. या क्षेत्रांमध्ये भारतासोबत सहकार्य वाढवणे अमेरिकेच्या हिताचे असेल, असे रामास्वामी म्हणाले.

रामास्वामी यांनी यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि ते म्हणाले की 'मला वाटते की ते भारतासाठी चांगले नेते आहेत आणि मला त्यांच्यासोबत भारत-अमेरिका संबंध मजबूत करायचे आहेत.'

कोण आहेत विवेक रामास्वामी?

विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील सर्वात तरुण उमेदवार आहेत. 38 वर्षीय रामास्वामी हे अब्जाधीश उद्योजक आणि बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेसचे संस्थापक आहेत.

23 ऑगस्ट रोजी मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेनंतर रामास्वामी यांची लोकप्रियता गगनाला भिडली. चर्चेदरम्यान त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या इतर उमेदवारांवर मात केली आणि यानंतर रामास्वामी यांना निवडणूक प्रचारासाठी मिळणाऱ्या देणग्यांमध्ये कमालीची झेप घेतली आहे. सध्या रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्यानंतर रामास्वामी हे दुसरे लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.

अमेरिका आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे

हे उल्लेखनीय आहे की चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिकेतील बहुतेक आयात देखील चीनमधूनच होते.

गेल्या वर्षी अमेरिका आणि चीनमधील व्यापार 690 अब्ज डॉलर इतका होता. अमेरिकेने गेल्या वर्षी चीनमधून 536 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली, जी एकूण आयातीच्या 17 टक्के आहे.

अमेरिकेने चीनला 154 अब्ज डॉलरची निर्यातही केली. अमेरिकन कंपन्याही चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT