Stem cell research will increase human lifespan up to 120 years, American Dr. Ernst von Schwarz claims Dainik Gomantak
ग्लोबल

Human Lifespan: स्टेम सेल संशोधनामुळे मानवी आयुर्मान 120 वर्षांपर्यंत वाढणार, अमेरिकन डॉक्टरचा दावा

Human Lifespan: अधिकृत नोंदीनुसार, मानवजातीच्या इतिहासात फक्त एक व्यक्ती 120 वर्षांच्या वयापर्यंत जगली आहे.

Ashutosh Masgaunde

Stem cell research will increase human lifespan up to 120 years, American Dr. Ernst von Schwarz claims:

1900 च्या सुरुवातीपासून, विज्ञान आणि आरोग्य सेवेतील मोठ्या प्रगतीमुळे, जगभरात मानवी आयुर्मान लक्षणीयरीत्या वाढले आहे.

लस आणि योग्य उपचार सुविधांच्या विकासामुळे मानवजातीला काही दशकांपूर्वी घातक मानल्या जाणाऱ्या अनेक रोगांवर विजय मिळवण्यात मदत झाली आहे.

जर सर्व काही सुरळीत झाले तर, पुढील काही वर्षांत मानव स्वतःला 120 वर्षे वयापर्यंत जगताना दिसेल.

न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, डॉ. अर्न्स्ट वॉन श्वार्झ यांना विश्वास आहे की स्टेम सेल संशोधनामुळे मानव या शतकाच्या अखेरीस 150 वर्षांपर्यंत जगू शकतील.

डॉ. अर्न्स्ट हे कार्डिओलॉजिस्ट आणि सीडर्स सिनाई मेडिकल सेंटरचे हृदय प्रत्यारोपण हृदयरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी “सिक्रेट्स ऑफ इमॉर्टॅलिटी” आणि “द सीक्रेट वर्ल्ड ऑफ स्टेम सेल थेरपी” सारखी पुस्तके लिहिली आहेत.

माझा विश्वास आहे की आपण मानवी आयुष्य वाढवू शकतो. कदाचित दोन वर्षांत लोक 120, 150 वर्षे जगू शकतील. आणि हे लोक फक्त अंथरुणावर खिलेल्या व्यक्ती म्हणून नव्हे तर खरोखर सक्रिय व्यक्ती म्हणून जे सामाजिक जीवनात, व्यावसायिक जीवनात भाग घेत जीवनाचा दर्जा मिळवू शकतात.
डॉ. अर्न्स्ट वॉन श्वार्झ

तथापि, आरोग्यपूर्ण आहार आणि नियमित व्यायाम करणे याशिवाय हे शक्य होणार नाही, यावर डॉ. अर्न्स्ट भर देतात. ते ठळकपणे सांगतात की 30 वर्षांचे वय असे असते जेव्हा एखाद्याला दीर्घ आयुष्यासाठी आपली जीवनशैली बदलण्याची आवश्यकता असते.

स्टेम सेल संशोधनाविषयी बोलताना डॉ. अर्न्स्ट म्हणाले, "गेल्या काही वर्षांत, आम्ही ज्याला प्रतिक्रियाशील औषध म्हणतो त्यापासून मुख्यतः स्टेम सेल थेरपीकडे वळलो आहोत."

"जरी स्टेम सेलला FDA ची मंजुरी नसली तरीही, हे औषधाचे भविष्य आहे जिथे आम्ही उत्तोमोत्तम उपचार करू शकतो. आणि आपण मानवी आयुष्य वाढवू शकतो किंवा वृद्धत्वाच्या काही प्रक्रिया कमी करू शकतो,” असे ते पुढे म्हणाले.

जरी अधिकृत नोंदीनुसार, मानवजातीच्या इतिहासात फक्त एक व्यक्ती 120 वर्षांच्या वयापर्यंत जगली आहे.

फ्रान्सची जीन कॅल्मेंट, 1997 मध्ये 122 वर्षे आणि 164 दिवसांच्या वयात मरण पावली ती ही एकमेव व्यक्ती आहे जिने हा पराक्रम केला. कॅल्मेंटच्या दीर्घायुष्यावरही प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT