Ranil Wickremesinghe Dainik Gomantak
ग्लोबल

Ranil Wickremesinghe Warns: मला हुकुमशहा म्हणा... सरकारविरोधी आंदोलन लष्कराला बोलावून मोडून काढू

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा इशारा; निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली

Akshay Nirmale

Ranil Wickremesinghe Warn: श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी मुदतीपुर्वीच संसदीय निवडणूक घेण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली. मुदतीपुर्वी निवडणूक घेणार नाही, जर सत्ता बदलण्यासाठी नजीकच्या भविष्यात कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले गेले, तर असे सरकारविरोधी आंदोलन लष्कर बोलावून मोडून काढले जाईल, असा इशाराच विक्रमसिंघे यांनी दिली.

(Sri Lankan Crisis)

विक्रमसिंघे बुधवारी संसदेत म्हणाले की, जोपर्यंत देशातील आर्थिक संकटावर उत्तर सापडत नाही, तोपर्यंत मी संसद बरखास्त करणार नाही. विक्रमसिंघे यांच्याकडे राजपक्षे यांचा उर्वरीत कार्यकाल पुर्ण करण्याचा जनादेश आहे. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. तथापि, विरोधी पक्ष लवकर निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. विक्रमसिंघे सरकाकडे निवडणुकीबाबतची विश्वासार्हता कमी आहे, त्यामुळे निवडणूक घ्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

विक्रमसिंघे म्हणाले, आंदोलक खुशाल मला हुकुमशहा म्हणतो, पण पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतेही आंदोलन, निदर्शने करता येणार नाही. सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी आणखी एक सामुहिक आंदोलन करण्याची योजना आखली जात आहे. पण मी याला परवानगी देणार नाही. जर आंदोलकांनी पुन्हा प्रयत्न केला तर हे आंदोलन रोखण्यासाठी मी लष्कर बोलावेन आणि आणीबाणी कायद्याचा वापर करेन.

रस्त्यावरील आंदोलनांमागे फ्रंटलाइन सोशलिस्ट पार्टी नावाचा कट्टर राजकीय पक्ष आहे. त्यांना त्यांची राजकीय उद्दिष्टे साध्य करायची आहेत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलरची मदत केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

73 वर्षीय विक्रमसिंघे यांनी जुलैमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारला हरोता. त्यापुर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे हे आर्थिक संकटाच्या पार्श्वभुमीवर देशात झालेल्या लोकांच्या उद्रेकानंतर देश सोडून गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT