Teodoro Obiang: 'या' आफ्रिकन देशाच्या राष्ट्राध्यक्षाची अनोखी कहाणी, 43 वर्षे केले राज्य अन्...

Equatorial Guinea Election Result: दरम्यान, सोमवारी आलेल्या निवडणूक निकालात त्यांनी पुन्हा एकदा विजयाची नोंद केली आहे. या 80 वर्षीय नेत्याला 99 टक्के मते मिळाली आहेत.
Teodoro Obiang
Teodoro ObiangDainik Gomantak
Published on
Updated on

Longest Reigning President In World: कोणत्याही देशात जिथे जनतेला नेता निवडण्याचा अधिकार आहे, तुम्ही 15 वर्षे किंवा जास्तीत जास्त 20 वर्षे 3 टर्ममध्ये राज्य करणाऱ्या नेत्याविषयी ऐकले असेल. त्याचबरोबर मतदानादरम्यानही तुम्ही विरोधी पक्षाला काही मतं मिळवताना पाहिलं असेल, पण जगात एक असा देश आहे, जिथे गेली 43 वर्षे एकच व्यक्ती राज्य करत आहे.

दरम्यान, सोमवारी आलेल्या निवडणूक निकालात त्यांनी पुन्हा एकदा विजयाची नोंद केली आहे. या 80 वर्षीय नेत्याला तब्बल 99 टक्के मते मिळाली आहेत. आम्ही ज्या नेत्याबद्दल बोलत आहोत, त्यांचे नाव तेओडोरो ओबियांग आहे. ओबियांग हे आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनीचे अध्यक्ष आहेत. यांना इक्वेटोरियल गिनी असेही म्हणतात. ओबियांग यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Teodoro Obiang
Pak Army Chief : कंगाल पाकिस्तानच्या लष्कराची कमान कोणाकडे, मोठी अपडेट आली समोर

या देशाची कथा

इक्वेटोरियल गिनी हा मध्य आफ्रिकेतील एक लहान तेल उत्पादक देश आहे. अहवालानुसार, इक्वेटोरियल गिनीमध्ये सोमवारी आलेल्या अध्यक्षीय, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी पक्ष PDGE मोठ्या फरकाने विजयी झाला. या सत्ताधारी पक्षाला जवळपास 99 टक्के मते मिळाली आहेत. 43 वर्षांपासून इथे राज्य करणारे अध्यक्ष टिओडोरो ओबियांग या विजयानंतर म्हणाले की, 'तुम्ही जे पेरता तेच उगवते'.

1979 मध्ये सत्तापालट करुन राष्ट्राध्यक्ष झाले

जगातील सर्वात जास्त काळ सत्ता गाजवण्याचा विक्रम टिओडोरो ओबियांग यांच्या नावावर झाला आहे. काकांच्या सत्तापालटानंतर ते देशाच्या प्रमुखाच्या खुर्चीवर बसले तेव्हा त्यांनी 1979 मध्ये सत्तेची चव चाखली. तेव्हापासून आजपर्यंत ते नेहमीच 90 टक्क्यांहून अधिक मतांनी विजयी होत आले आहेत. यावेळी त्यांच्यासमोर बुवेनाव्हेंटुरा मोन्सू असुमु आणि आंद्रेस एसोनो ओंडो हे दोन विरोधी उमेदवार होते. यातून असुमू गेल्या 5 वेळा त्यांच्याविरुद्ध लढत असूनही ते विजयापासून कोसो दूर आहेत. ओंडोची ही पहिलीच निवडणूक (Election) होती.

Teodoro Obiang
Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये उणे 20 अंश तापमानात 30 लाख लोकांवर घर सोडायची वेळ

निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला

सुमारे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात केवळ 4 दशलक्ष लोक मतदानासाठी नोंदणीकृत आहेत. निवडणूक निकाल पाहता इसोनो ओंडे यांनी या निवडणुकीला फसवणूक म्हटले आहे. या निवडणुकीच्या निकालाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Teodoro Obiang
Russia Ukraine War: रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक

तसेच, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी अधिकारी लोकांवर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी सरकारकडून अशा आरोपांवर कोणतेही वक्तव्य आलेले नाही. दुसरीकडे, अमेरिका (America) आणि युरोपियन युनियनने देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना आणि विरोधकांना धमकावल्याच्या वृत्तावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com