Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिघडली; नागरिकांची चिंता वाढली

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासुन श्रीलंका अर्थिक संकटाच्या फेऱ्यात गर्ता घेत असून हे संकट आणखी गडद होण्याची स्थिती श्रीलंकेवर आली आहे. कारण श्रीलंकेत पेट्रोल संपले आहे. परकीय चलनाचा साठा संपला आहे. परदेशातून तेलासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी श्रीलंकेकडे पुरेसे पैसे नसल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केलं आहे. (Sri Lanka's economic situation deteriorated; concern citizens increased)

दैनंदीन गरजेच्या वस्तू न मिळाल्याने नागरिक ही चिंतेत आहेत याचाच अर्थ आज श्रीलंकेची गाडी ठप्प होणार आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपला आहे. इतर देशांतून पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा शिल्लक नाही. 15 तास वीज कपात आणि महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.

पंतप्रधान रानिल विक्रम सिंघे यांना देशाचा खर्च चालवण्यासाठी 2.4 ट्रिलियन श्रीलंकन ​​रुपयांची गरज आहे. तर सरकारला मिळालेला महसूल केवळ 1.6 ट्रिलियन श्रीलंकन ​​रुपये आहे. त्याची भरपाई म्हणून श्रीलंकेतील मालमत्ता विकण्यापर्यंत मजल गेली आहे. आता श्रीलंका सरकारने सरकारी विमान कंपन्या खासगी हातात देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने श्रीलंकेला दिला मदतीचा हात

गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारताने 4,00,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त डिझेलची 12वी खेप पुरवली आहे. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबत ट्विट केले की 12 वी खेप आणि 4,00,000 मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा करण्यात आला. सवलतीच्या कर्ज योजनेअंतर्गत आज भारताकडून डिझेलची नवीन खेप कोलंबोला पुरविण्यात आली. असे चित्र असल्याने श्रीलंकेने आता आंतराष्ट्रीय संस्था काही अर्थिक मदत पुरवू शकतात का हे ही पाहणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT