cyber Dainik Gomantak
ग्लोबल

शत्रूसाठी हेरगिरी! व्हॉट्सअ‍ॅपवरुन मोठी घरफोडी, लष्करी अधिकारी गोत्यात

सुरक्षा एजन्सींनी सायबर सुरक्षा उल्लंघनाशी संबंधित एक मोठे प्रकरण उघडकीस आणले, या प्रकरणात काही लष्करी अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.

दैनिक गोमन्तक

सुरक्षा एजन्सींनी सायबर सुरक्षा उल्लंघनाशी संबंधित एक मोठे प्रकरण उघडकीस आणले, या प्रकरणात काही लष्करी अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. आरोपींनी शत्रू देशासाठी हेरगिरीच्या कारवाया केल्याचा तपास यंत्रणांना संशय असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराशी संबंधित सायबर घरफोडी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून करण्यात आली. (Spying for the enemy Big burglary from WhatsApp military officer caught)

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत दोषी आढळलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. हा मुद्दा संवेदनशील असल्याने तपास यंत्रणांनी याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. त्यामुळे सध्या फारशी माहिती देता येणार नाही असंही सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीन (Chaina) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) गुप्तचर संस्थांशी संबंधित लोक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. याद्वारे ते लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बहुतांश घटनांमध्ये त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसत आहेत, पण काही अधिकारीही त्याचे बळी ठरत आहेत.

भारतीय लष्कर सतत शेजारील देशांच्या हॅकर्सच्या निशाण्यावर असते. यापूर्वी भारतीय लष्कर आणि मुत्सद्दींना लक्ष्य करणारे एक नवीन हॅकिंग सॉफ्टवेअर उघड झाले होते. रिपोर्ट्सनुसार, CapraRAT नावाचा मालवेअर हॅकर्सच्या एका गटाने भारतीय लष्कराचे जवान आणि राजनयिकांना लक्ष्य करून तयार केले होते.

या मालवेअरच्या मदतीने अँड्रॉईड उपकरणे देखील हॅक केली जाऊ शकतात. हे रिमोट ऍक्सेस ट्रोजन (RAT) आहे, जे लोकेशन, संपर्क क्रमांक आणि वापरकर्त्यांच्या कॉल इतिहासासह अनेक वैयक्तिक तपशील चोरू शकतात.

वैयक्तिक डेटा चोरी होऊ शकतो

या हॅकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅकर्स यूजर्सच्या फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन देखील ऍक्सेस करू शकतात, ज्याच्या मदतीने त्यांची माहिती चोरली जाण्याची शक्यता आहे. नवीन हॅकिंग टूलची ओळख सायबर सुरक्षा फर्म ट्रेंड मायक्रोनने केली आहे. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली आहे. फर्मने कळवले की APT36 CapraRAT स्पॉट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT