Euro Cup 2024 Final X Handle
ग्लोबल

Spain Win Euro 2024: स्पेन चौथ्यांदा युरो विजेते; इंग्लंडवर 2-1 फरकाने मात

Euro Cup 2024 Final: सर्वाधिक चार वेळा युरो करंडक जिंकणारा स्पेन पहिला संघ ठरला आहे.

किशोर पेटकर

सामन्यातील चार मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू मिकेल ओयार्थाबाल याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर स्पेनने विक्रमी चौथ्यांदा युरो करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. चुरशीच्या अंतिम लढतीत त्यांनी इंग्लंडला २-१ फरकाने नमविले.

निको विल्यम्स याने ४७व्या मिनिटास स्पेनसाठी आघाडीचा गोल केल्यानंतर, इंग्लंडचा बदली खेळाडू कोल पामर याने ७३व्या मिनिटास बरोबरीचा गोल केला.

कर्णधार अल्वारो मोराटा याची संघात जागा घेतलेल्या ओयार्थाबाल याने डॅनी ओल्मो याच्या असिस्टवर इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्जन पिकफोर्ड याला चकवा दिला आणि स्पेनला पुन्हा एकदा आघाडी मिळाली. हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला.

सर्वाधिक चार वेळा युरो करंडक जिंकणारा स्पेन पहिला संघ ठरला आहे. त्यांनी यापूर्वी १९६४, २००८ व २०१२ मध्ये विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

गतवेळी त्यांना पेनल्टी शूटआऊटवर इटलीने नमविले होते. त्यामुळे युगोस्लाव्हियानंतर दोन वेळा उपविजेता ठरणारा इंग्लंड युरो करंडकातील दुसरा संघ ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Bicholim Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

SCROLL FOR NEXT