Sunburn Festival 2024 : सनबर्नवाले 'निष्पाप' मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने विरोधक संतप्त; महोत्सवाला विरोध तीव्र

Sunburn Festival : ‘फेस्टिव्हल आयोजकांना ‘बापडे’ संबोधल्याने विरोधकांतून संताप
सनबर्नवाले 'निष्पाप' मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने विरोधक संतप्त; महोत्सवाला विरोध तीव्र
Sunburn Goa 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

‘सनबर्न’ या खासगी फेस्टिव्हलवरून अधिवेशनापूर्वीच वातावरण तापले आहे. ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ‘सनबर्न''च्या तिकीट विक्रीच्या पोस्टवरून हा महोत्सव दक्षिण गोव्यात होणार असल्याचे गृहीत धरून विरोधी गटाने सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे.

त्यातच मुख्यमंत्र्यांनी ‘सनबर्न’च्या आयोजकांना ‘बापडे’ (निष्पाप) संबोधल्याने त्यांचे हे वक्तव्य आगीत तेल ओतणारे ठरले आहे.

काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले की, सनबर्न हा ड्रग्स फेस्टिव्हल आहे. ही आपली संस्कृती नाही. भाजप आणि इतर पक्षांनी राजकीय संलग्नता न बाळगता या फेस्टिव्हलविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे. हा लढा भावी पिढ्यांचे रक्षण आणि गोवावासीयांची ओळख वाचविण्यासाठी आहे.

गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे, की आमचा पक्ष संमतीने विकासाचे मॉडेल फॉलो करतो. सार्वजनिक पाठिंबा नसलेला कोणताही प्रकल्प, क्रियाकल्प स्वाभाविकपणे स्वागतार्ह नसेल.

सनबर्नवाले 'निष्पाप' मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने विरोधक संतप्त; महोत्सवाला विरोध तीव्र
Goa Murder Case: कौले काढून घरात शिरला, OCI कार्डधारकाची हत्या करुन फरार झाला

विरोधकांना आयतेच कोलीत

‘सनबर्न’ हा खासगी फेस्टिव्हल आहे. अशा खासगी फेस्टिव्हलना लोक का विरोध करतात, हे मला कळत नाही. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दक्षिण गोव्यात परवानगी मागितली आहे. सरकार त्यावर विचार करेल.

अशा पद्धतीने त्या ‘बापड्यांना’ प्रत्येकवेळी उशिराच परवानगी मिळते‌, असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे.

असंवेदनशील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुख्यात सनबर्न फेस्टिव्हलच्या प्रवर्तकाला ‘बापडा’ म्हणत पुन्हा एकदा गोमंतकीयांचा अपमान केला आहे. त्यांचे हे विधान भाजप सरकारच्या गरीबविरोधी धोरणामुळे त्रस्त झालेल्या तमाम गोमंतकीयांचा अपमान आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो, असे विरोधी पक्षनेते आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com