COVID-19

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना झाली कोरोनाची लागण

रामाफोसा यांचे लसीकरण झाले आहे. त्यांना कोरोनाव्हायरसच्या कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे, या बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा (Cyril Ramaphosa) यांना कोरोनाची लागण झाली आहे. रामाफोसा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोविड-19 (COVID-19) चाचणी करण्यात आली, असे राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) लष्करी आरोग्य सेवेद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, असे राष्ट्रपती कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. सध्या उपराष्ट्रपती डेव्हिड माबुझा देशाचा कारभार बघत आहेत.

रामाफोसा यांचे लसीकरण झाले आहे. त्यांना कोरोनाव्हायरसच्या कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे, या बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या आठवड्यात रामाफोसा यांनी पश्चिम आफ्रिकेच्या चार देशांना भेट दिली होती. भेटी दरम्यान, प्रतेक देशात त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दौऱ्यादरम्यान, त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित सहकारी तत्काळ साऊथ आफ्रिकेला परतले.

रामाफोसा यांनी दक्षिण आफ्रिकेतील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने रविवारी राष्ट्रपतींच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT