Solar Storm News Dainik Gomantak
ग्लोबल

Solar Storm Alert: पृथ्वीवर सौर वादळ धडकणार? 'या' सेवांवर होणार परिणाम

15 जुलै रोजी सूर्यावर ज्वालांचा स्फोट (Solar Flare Eruption) झाला असून यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेमुळे सौर वादळ तयार झालं आहे.

दैनिक गोमन्तक

संशोधकांनी पृथ्वीवर सौर वादळ (Solar Storm) धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. अंतराळ हवामान संशोधक डॉ. तमिथा स्कोव यांनी पृथ्वीवर मोठं सौर वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सर्वच शास्त्रज्ञांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. 15 जुलै रोजी सूर्यावर ज्वालांचा स्फोट (Solar Flare Eruption) झाला असून यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेमुळे सौर वादळ तयार झालं आहे. हे सौर वादळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकण्याची शक्यता असून याचा परिणाम मोबाईल (Mobile), सॅटेलाइट आणि जीपीएस (GPS) सेवांवर होण्याची शक्यता आहे. (Solar Storm Alert News)

सूर्याच्या (Sun) पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात हालचाली होत आहेत. 15 जुलै रोजी सूर्यावर ज्वालांचा मोठा स्फोट झाला असून याचा परिणाम पृथ्वीवरही जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 19 जुलै रोजी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये एक छिद्र पडलं. यातून छिद्रातून सौर वादळ पृथ्वीवर आदळलं होतं. अंतराळ संशोधकांच्या मते, येत्या आठवड्यात सूर्याच्या पृथ्वीकडील पृष्ठभागावर सनस्पॉट दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनाने (NOAA - National Oceanic and Atmospheric Administration) पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पृथ्वीकडील पृष्ठभागावर सनस्पॉट तयार होण्याची शक्यता आहे. या सनस्पॉटमधून मोठ्या प्रमाणात आणि शक्तिशाली अशा सौर ज्वाळा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यामुळे रेडिओ ब्लॅकआऊट होऊन याचा परिणाम मोबाईल (Mobile), जीपीएस (GPS) सेवांवर होण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी भूचुंबकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. पृथ्वीवर सौर वादळ धडकल्यास याचा परिणाम मोबाईल, सॅटेलाइट (Satelite) आणि जीपीएस (GPS) सेवांवर होण्याची शक्यता आहे.

सनस्पॉट म्हणजे सूर्यप्रकाशातील गडद भाग. चुंबकत्वामुळे सूर्यावर जे गडद भाग तयार होतो याला 'सनस्पॉट' असं म्हणतात. सनस्पॉट्स काही तासांपासून काही महिने टिकू शकतात. सर्व सनस्पॉट्समुळे सौर ज्वाला तयार होत नाहीत, मात्र याचा पृथ्वीवर (Earth) देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT