World Highest Paid PM Salary Singapore Dainik Gomantak
ग्लोबल

World Highest Paid PM: वर्षाला 26.9 कोटींचे वेतन, अमेरिकन अध्यक्षांपेक्षा 7 पटीने जास्त, पगारात 64 टक्क्यांची वाढ घसघशीत; सिंगापूरचे PM जगातील सर्वात श्रीमंत नेते

World Highest Paid PM Salary Singapore: सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे आधीपासूनच जगात सर्वाधिक वेतन घेणारे देशाध्यक्ष आहेत, परंतु आता त्यांच्या पगारात आणखी तब्बल 64 टक्क्यांची भरभक्कम वाढ होणार आहे.

Manish Jadhav

World Highest Paid PM Salary Singapore: सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे आधीपासूनच जगात सर्वाधिक वेतन घेणारे देशाध्यक्ष आहेत, परंतु आता त्यांच्या पगारात आणखी तब्बल 64 टक्क्यांची भरभक्कम वाढ होणार आहे. 15 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या नवीन वेतनवाढीनंतर सिंगापूरच्या पंतप्रधानांचे वार्षिक वेतन तब्बल 3.6 दशलक्ष सिंगापूर डॉलर (सुमारे 26.9 कोटी रुपये) होणार आहे. हे वेतन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्षाला मिळणाऱ्या 4 लाख डॉलरच्या वेतनापेक्षा तब्बल सात पटीने जास्त आहे. या वेतनवाढीमुळे जागतिक राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय जगतात सिंगापूरच्या या धोरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

सिंगापूरच्या संसदेत मंगळवारी बोलताना पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी स्वतः या वेतन दुरुस्तीची माहिती दिली. सिंगापूर सरकारने या धोरणाचे समर्थन करताना स्पष्ट केले की, देशात अत्यंत हुशार, सक्षम आणि प्रामाणिक लोकांना राजकारणात तसेच प्रशासनात आकर्षित करण्यासाठी उच्च वेतन देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देशात भ्रष्टाचारमुक्त आणि कार्यक्षम प्रशासन चालवण्यास मदत होते. या निर्णयानुसार केवळ पंतप्रधानच नव्हे, तर उपपंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या वेतनातही मोठी वाढ करण्यात आली आहे.

लॉरेन्स वोंग यांनी मानले की, नेत्यांचा पगार हा नेहमीच एक संवेदनशील आणि भावनिक विषय राहिला आहे आणि सामान्य जनतेच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही रक्कम खूप मोठी असल्याने लोकांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक आहे. परंतु, उत्तम नेतृत्व आणि पारदर्शक कारभारासाठी ही प्रणाली गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पंतप्रधान वोंग यांनी एक मोठा आणि औदार्याचा निर्णय जाहीर करत आपल्या या कार्यकाळात वाढलेली पूर्ण अतिरिक्त वेतनाची रक्कम विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यांसाठी दान करण्याची घोषणा केली.

जागतिक स्तरावर राजकीय नेत्यांच्या वेतनाचा विचार केल्यास, सिंगापूरच्या (Singapore) पंतप्रधानांनंतर दुसऱ्या क्रमांकावर हॉंगकॉंगच्या प्रशासकीय प्रमुखांचा (सुमारे 7.19 लाख डॉलर) तर तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचा (6.06 लाख डॉलर) क्रमांक लागतो. मात्र, वोंग यांचे नवे वेतन या सर्वांच्या तुलनेत कैक पटीने जास्त आहे. 15 वर्षांनंतर सिंगापूरमध्ये मंत्र्यांच्या वेतनात हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून गुणवत्तेला वाव मिळतो, असा सिंगापूर प्रशासनाचा ठाम दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

SCROLL FOR NEXT