China Ship on Hambanthota Dainik Gomantak
ग्लोबल

China Ship on Hambanthota: भारतीय सीमेवर तणाव निर्माण करणारी 5 कारणे तुम्हाला माहितीयेत का?

चीनचे 'युआन वांग-5' हे जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात आल्यापासून भारताच्या तणावामध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनचे 'युआन वांग-5' (Chinese Ship) हे जहाज श्रीलंकेच्या (chinese ship arrives at sri lanka) हंबनटोटा बंदरात आल्यापासून भारताच्या तणावामध्ये (china ship tension for india) वाढ झाली आहे. दरम्यान चीनवर विश्वास ठेवता येत नसल्याने भारताने सुरक्षेची चिंता करणे साहजिकच आहे. यापूर्वी भारत आणि अमेरिकेच्या आक्षेपानंतर श्रीलंकेने चिनी जहाजाच्या प्रवेशावर बंदी घातली होती, मात्र आता हंबनटोटा बंदरामध्ये या जहाजाची एन्ट्री करण्यात आली आहे. (Since the arrival of the Chinese ship Yuan Wang 5 in Sri Lanka Hambantota port India tension has increased)

खरं तर, चीनने 15 ऑगस्ट रोजी सांगितले (Chinese spy ship) आहे की श्रीलंकेने मंगळवारी आपल्या उपग्रह आणि क्षेपणास्त्र निरीक्षण जहाजाला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिली होती, परंतु श्रीलंकेशी झालेल्या संभाषणाचा तपशील अध्याप दिलेला नाहीये.

युआंग वांग 5 या चिनी जहाजामध्ये (China Ship on Hambanthota) सेन्सर आहेत जे चाचणी केल्यावर भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेऊ शकतात आणि भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावर आपल्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे.

चीन, जहाजाच्या उच्च-तंत्रज्ञान क्षमतेचा वापर करून, चाचणी केल्यावर भारतीय क्षेपणास्त्रांच्या श्रेणी आणि अचूकतेचे मूल्यांकन देखील करू शकतो. तसेच हे जहाज 22 ऑगस्टपर्यंत बंदरातच राहणार आहे.

Yuang Wang-5 हिंद महासागरात पाणबुडी (Hambantota Port) ऑपरेशन्स सुलभ करणारे समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण देखील करू शकते तसेच 2021 मध्येही एक चिनी जहाज 'जियांग यांग हाँग-03' हिंद महासागरात याच भागात कार्यरत होते आणि सुमात्राच्या पश्चिमेला शोध मोहीम राबवत होते.

2014 मध्ये कोलंबोने चीनच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीला त्याच्या एका बंदरात डॉक करण्याची परवानगी दिल्यानंतर भारत-लंका संबंध ताणले गेले आणि यावेळी श्रीलंकेने म्हटले आहे की जहाजाला आपली ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम कार्यरत ठेवावी लागेल.

श्रीलंकेच्या विकासासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने 99 वर्षांसाठी चायना मर्चंट पोर्ट होल्डिंगला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या हंबनटोटा बंदरावर भारताची चिंता केंद्रित आहे आणि याच कारणामुळे आता चिनी हेरगिरीचे जहाज श्रीलंकेच्या बंदरात दाखल झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT