West Bengal Crime News  Dainik Gomantak
ग्लोबल

West Bengal : प्रेमासाठी अवैधपणे भारतात घुसली, पण प्रियकराचा तिला नेपाळला विकण्याचा होता प्लॅन

प्रेमासाठी बांगलादेशातून सिलीगुडीला आलेली ही 21 वर्षीय मुलगी एका जाळ्यात अडकली.

गोमन्तक डिजिटल टीम

अलिकडेच प्रेमासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेमकहाणी संपूर्ण देशाने पाहिली आहे. अशीच एक प्रेमकहाणी पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथून समोर आली आहे. पण या प्रेमकहाणीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

प्रेमासाठी बांगलादेशातून सिलीगुडीला आलेली ही 21 वर्षीय मुलगी एका जाळ्यात अडकली. प्रेमासाठी जीव धोक्यात घालून भारतातील आलेल्या या मुलीला प्रियकराचा खरा हेतू लक्षात आल्यानंतर तिने तेथून पळ काढला.

सपला अख्तर ही 21 वर्षीय युवती अडीच महिन्यांपूर्वी बांगलादेशातून अवैधरित्या भारतात दाखल झाली. सिलीगुडीमध्ये तिच्या प्रियकरासोबत ती राहत होती. पण एके दिवशी तरुणीला तिचा प्रियकर नेपाळमध्ये विकण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली.

तरुणीच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरताच ती प्रियकरापासून जीव वाचवून पळून गेली. ती मुलगी ट्रेन पकडण्यासाठी सिलीगुडी रेल्वे जंक्शनवर पोहोचली होती, असे सांगण्यात आले, तेव्हाच एका स्वयंसेवी संस्थेने तिला संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले.

सपला अख्तरला संघटनेच्या सदस्यांनी प्रधान नगर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीनंतर पोलिसांनी बांगलादेशी तरुणीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करून गुरुवारी तिला सिलीगुडी न्यायालयात हजर केले.

सिलीगुडी पोलिसांनी युवतीची चौकशी केली असता तिची कहाणी पोलिसांना कळाली व तरुणीच्या प्रियकराचा सर्वत्र शोध सुरू झाला. तरूणीचा प्रियकर अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सीमा हैदर आणि सचिन

दरम्यान, पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या सीमा हैदरची 2020 साली PUBG गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडाच्या सचिनशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले आणि 10 मार्च रोजी दोघेही नेपाळमधील एका हॉटेलमध्ये भेटले. त्यादरम्यान दोघांनीही मंदिरात लग्न केल्याचा दावा सीमाने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

Udhampur Encounter: घरात लपून केला गोळीबार, पण जवानांनी घेतला बदला! उधमपूरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; सुरक्षा दलांचं 'ऑपरेशन ऑल आऊट'

SCROLL FOR NEXT