Lt. Sukhbir Toor Dainik Gomantak
ग्लोबल

US: शीख अधिकाऱ्याला 5 वर्षांच्या संघर्षानंतर पगडी घालण्याची मिळाली परवानगी

न्यूयॉर्क टाइम्सच्या (New York Times) बातमीनुसार, मरीन कॉर्प्सच्या 246 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्याला पगडी (Turban) घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकन सैन्यात (US Army) कार्यरत असलेल्या एका शीख अधिकाऱ्याला तब्बल पाच वर्षानंतर आता आपली पगडी घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लेफ्टनंट सुखबीर तूर (Lt. Sukhbir Toor) यांना आता दैनंदिन ड्युटी दरम्यान पगडी घालू शकणार आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, मरीन कॉर्प्सच्या (Marine Corps) 246 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्याला पगडी (Turban) घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेखेरीज ब्रिटन (Britain), कॅनडा, ऑस्ट्रेलियामध्ये आता शीख सैनिकांना अशी सूट देण्यात आली आहे.

लेफ्टनंट तूर 2017 मध्ये मरीनमध्ये सामील झाले असून, तेव्हापासून त्यांना पगडी ठेवण्याबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. लेफ्टनंट सुखबीर तूर म्हणतात की, आता त्यांना पूर्वीसारखा आपला देश आणि त्याच्या धार्मिक भावना यांच्यात निवड करावी लागणार नाही, ते दोघांनाही सोबत घेऊन पुढे जाऊ शकतात.

पगडी घालण्यासाठी, लेफ्टनंट तूर यांना काही अटी मान्य कराव्या लागतील. त्यांना त्यांच्या दैनंदिन कर्तव्याच्या वेळी पगडी घालण्याची परवानगी असेल, परंतु जर कोणत्याही हिंसाचाराच्या ठिकाणी कर्तव्य लादले गेले तर ते तिथे ते पगडी परिधान करु शकणार नाहीत. तसेच, जर एखाद्या युनिटचा समारंभ असेल तर त्यांना पूर्ण ड्रेस अंतर्गत परवानगी दिली जाणार नाही.

लेफ्टनंट तूर म्हणतात की, आता आम्हाला या प्रकरणात काहीसा विजय मिळाला आहे, परंतु पुढील लढा अजूनही सुरुच राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT