पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि दिवंगत कॉंग्रेस नेता सिद्धू मुसेवाला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे प्रकरण पाकिस्तानच्या पंजाब प्रांताशी संबंधित आहे. 17 जुलै रोजी इथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या होर्डिंगमध्ये सिद्धू मुसेवालाचा फोटो आहे. त्याच्या फोटोसोबत '295' हा आकडाही कोरला आहे. (siddhu moose wala photo appears on election hoardings in pakistan)
दरम्यान, पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील आगामी पोटनिवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ (PTI) जनतेमध्ये लोकप्रियता कॅश करण्यासाठी सिद्धू मुसेवालाचा वापर करत आहे. न्यूज इंटरनॅशनल वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुलतान भागातील PP-217 जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफच्या होर्डिंग्जवर मुसेवालााचा फोटो वापरण्यात आले आहे. या होर्डिंगवर माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांचा मुलगा जैन कुरेशी यांचाही फोटो आहे.
अहवालात म्हटले आहे की, 'पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेल्या निवडणुकीच्या पोस्टर्समध्ये मुसेवालाच्या लोकप्रिय गाण्याचा संदर्भ असलेल्या "295" शब्दांसह मुसेवालाचा फोटो आहे. हे गाणे भारतीय दंड संहितेच्या कलमावर भाष्य करणारे आहे. जे धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित आहे.'
मुसेवालाच्या फोटोवर कुरेशी काय म्हणाले?
जैन कुरेशी यांना निवडणुकीच्या होर्डिंगवर मुसेवालाच्या फोटोबाबत विचारले असता त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. त्यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितले की, “ज्यांनी पोस्टरवर सिद्धू मुसेवालाचा फोटो वापरला त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो कारण या फोटोमुळे हे पोस्टर खूप व्हायरल झाले आहे. आमचे कोणतेही पोस्टर यापूर्वी व्हायरल झाले नव्हते.''
विशेष म्हणजे, 28 वर्षीय शुभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये त्याने काँग्रेसच्या तिकिटावर मानसामधून विधानसभा निवडणूक लढवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.