अंधारमय बनला पाकिस्तान, वीज संकटाचा करावा लागतोय सामना

पाकिस्तानमध्ये वीजटंचाईमुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.
Pakistani People
Pakistani PeopleDainik Gomantak
Published on
Updated on

Power Crisis In Pakistan: पाकिस्तानमध्ये वीजटंचाईमुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. पाकिस्तान नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बोर्डाने (NITB) देखील याबाबत इशारा दिला आहे. यासंदर्भातील ट्विटमध्ये NITB ने म्हटले की, 'देशभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या टेलिकॉम ऑपरेटर्संनी मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वीज खंडित झाल्यामुळे ऑपरेटर्संना त्रास होत आहे. त्यामुळे या सेवा बंद ठेवाव्या लागत आहेत.' (mobile internet may shut down due to power crisis in pakistan)

असा इशारा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिला

त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी याआधीच आणखी वीज कपातीचा इशारा दिला आहे. वाढत्या दबावामुळे जुलैमध्ये आणखी विजेचे संकट निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान शरीफ म्हणाले की, 'पाकिस्तानला आवश्यकतेनुसार नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नाही.' युती सरकार मात्र हा करार शक्य व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Pakistani People
पाकिस्तान सिनेसृष्टीला अखेरची घरघर

लिक्विड वायूचा पुरवठा न झाल्यामुळे समस्या

विशेष म्हणजे, पाकिस्तान (Pakistan) सतत वीज संकटाशी झुंज देत आहे. जिओ न्यूजनुसार, पुढील महिन्यात होणाऱ्या गॅस पुरवठ्याचा करार अद्याप झालेला नाही. त्याच वेळी, तीव्र उष्णतेच्या दरम्यान विजेची सर्वाधिक मागणी असताना पाकिस्तान लिक्वीड वायूच्या पुरवठ्यासाठी संघर्ष करत असल्याचे आकडे समोर येत आहेत. दुसरीकडे, वीजेची बचत करण्यासाठी पाकिस्तान सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी केले आहेत. यासोबतच कराचीसह (Karachi) विविध शहरांतील शॉपिंग मॉल्स आणि कारखाने संध्याकाळपूर्वी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com