Shri Thanedar, a Member of Parliament of Indian origin in America, has strongly criticized the terrorist organization Hamas. Dainik Gomantak
ग्लोबल

'Hamas ला रोखण्याची नव्हे तर संपवण्याची गरज', भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदाराने व्यक्त केला संताप

Ashutosh Masgaunde

Shri Thanedar, a Member of Parliament of Indian origin in America, has strongly criticized the terrorist organization Hamas:

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी हमास या दहशतवादी संघटनेवर जोरदार टीका केली असून, हमासला जगातून कायमचे नेस्तनाबूत करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

ठाणेदार यांनी हमासचे वर्णन रानटी दहशतवादी संघटना असे केले आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमेत घुसून निरपराध लोक आणि लष्कराच्या जवानांना लक्ष्य केले होते.

हमासच्या दहशतवाद्यांनी महिला, लहान मुले आणि वृद्धांनाही सोडले नाही आणि 1400 लोकांना ठार केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कर गाझा पट्टीवर बॉम्बफेक करत आहे.

यूएस कॅपिटल हिल येथे आयोजित एका कार्यक्रमात ठाणेदार म्हणाले की, 'हमास ही केवळ एक अतिरेकी संघटना किंवा प्रतिकार चळवळ नाही, तर ती केवळ एक रानटी दहशतवादी संघटना आहे. त्यांना समजावून सांगण्याचा दुसरा मार्ग नाही.

ठाणेदार यांनी सांगितले की, आता वेळ आली आहे की आपण त्यांना फक्त न रोखता या जगातून कायमचे मिटवण्याची गरज आहे.

इस्त्रायलच्या समर्थनार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये इतर अनेक समाजाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

अमेरिकन खासदार ठाणेदार म्हणाले की, 'आपल्याला हमासच्या लष्करी कारवाया पूर्णपणे संपवण्याची गरज आहे जेणेकरून पॅलेस्टिनी लोकांना मुक्त करता येईल.

गाझा पट्टीत दोन दशलक्ष लोक राहतात आणि त्यांना दहशतवादी नियंत्रणातून मुक्त करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या हिंदू, शीख, ज्यू, हजारा आणि याझिदी समाजाच्या सुरक्षेसाठी धोरणे आखण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली.

ठाणेदार यांनी अलीकडेच अमेरिकन काँग्रेसमध्ये हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन यांचा समावेश असलेल्या कॉकसची स्थापना केली आहे. कॉकसचे म्हणणे आहे की अमेरिकेत हिंदूफोबिया वाढत आहे, जो थांबवण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT