Jack Dorsey  Dainik Gomantak
ग्लोबल

धक्कादायक खुलासे! Jack Dorsey ने सांगितले, शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरसोबत काय काय केले...

Ashutosh Masgaunde

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. जॅक डोर्सी म्हणतात की, भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

डॉर्सी यांनी दावा केला की, भारत सरकारने आपल्यावर दबाव आणला होता आणि भारतात ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती.

जॅक डोर्सीचा आरोप

'ब्रेकिंग पॉइंट्स' या यूट्यूब चॅनलने ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.

यातील एक प्रश्‍न असा होता की, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कधी सरकारकडून झाला होता का? प्रत्युत्तरात डॉर्सी यांनी असे अनेकवेळा घडल्याचे सांगितले आणि डॉर्सीने भारताचे उदाहरण दिले.

"...आणि भारत लोकशाही देश आहे"

डॉर्सी म्हणाले, ''असे अनेकवेळा झाले. भारतातच पहा. शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटर हँडल ब्लॉक करण्यासाठी मोदी सरकारकडून अनेक शिफारसी करण्यात आल्या होत्या. यात अशा पत्रकारांचा समावेश करण्यात आला होता, जे सरकारवर टीका करत होते.

यादरम्यान, आम्ही भारतात ट्विटर बंद करू, अशी धमकी देण्यात आली होती. तुमच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आम्ही छापे टाकू. तुम्ही त्याचे पालन न केल्यास, तुमची कार्यालये बंद केली जातील. आणि हा भारत लोकशाही देश आहे.

केंद्रीय मंत्र्याने आरोप फेटाळले

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, डोर्सीचे दावे चुकीचे आहेत. डोर्सी यांच्या कार्यकाळात ट्विटर आणि त्यांची टीम सातत्याने भारतीय कायद्यांचे उल्लंघन करत होती. चंद्रशेखर यांच्या म्हणण्यानुसार 2020 ते 2022 पर्यंत अनेक वेळा नियम तोडले गेले.

विरोधक आक्रमक

जॅक डोर्सी यांच्या दाव्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून, "मोदी सरकारने शेतकऱ्यांची आणि शेतकरी आंदोलनाची ट्विटर अकाउंट्स बंद करण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला. सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची खाती बंद करा. अन्यथा, ट्विटर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर छापे टाकले जातील. ट्विटरचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी एका टीव्ही मुलाखतीत हे सर्व मान्य केले आहे. यावर मोदी सरकार उत्तर देईल का?" असा प्रश्न विचारला

तीन कृषी कायदे

नोव्हेंबर 2020 मध्ये, भारत सरकारने देशात तीन कृषी कायदे लागू केले. मात्र, कायदा लागू होताच त्यांचा विरोधही सुरू झाला आणि वर्षभरापासून देशभर आंदोलने, धरणे झाली.

अखेर एका वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. आंदोलनादरम्यान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.

तुर्कीमध्ये ट्विटरवर होती बंदी

9 वर्षांपूर्वी तुर्कीच्या न्यायालयाने देशात ट्विटरवर बंदी घातली होती. टेलिकॉम वॉचडॉग BTecki नुसार, स्थानिक लोकांच्या तक्रारींमुळे ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंगमुळे त्यांचे वैयक्तिक संबंध बिघडत असल्याची तक्रार लोकांनी केली. असे कारण देत ट्विटरवर बंदी घातली होती. मात्र काही काळानंतप तुर्कीत पुन्हा ट्विटर सुरू झाले. मात्र, तुर्की सरकार आणि ट्विटरमध्ये सातत्याने वाद होत असतात.

डॉर्सी संध्या काय करतात?

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी एक नवीन सोशल मीडिया अॅप लाँच केले आहे.

डोर्सी यांनी 'BlueSky' या नावाने ते सादर केले आहे. हे अगदी ट्विटरसारखे दिसते. BlueSky सध्या ऍपलच्या अॅप स्टोअरवर चाचणीसाठी उपलब्ध आहे. लवकरच ते अँड्रॉइडवरही पाहता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT