UAE: संयुक्त अरब अमीरात ( युएई ) चे नाव घेतले की पहिल्यांदा डोळ्यासमोर उंच इमारती, झगमगाट आणि आलिशान आयुष्य समोर येते. मात्र य़ुएईची एक दुसरी बाजूही आहे जी आजही समोर येताना दिसत नाही.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आफ्रिकेतून मानवी तस्करीतून तरुण महिलांना युएईमध्ये आणले जात आहे. फसवणूक करुन आणलेल्या या महिलांच्या मजबूरीचा फायदा घेऊन त्यांना वेश्यालयात ढकलले जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.
याशिवाय, त्यांची अमानुष पद्धतीने छळ केला जात असल्याचे देखील या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नायजेरियाहून फसवून युएईमध्ये आणलेल्या 25 पीडीत महिलांबरोबर संवाद साधून रॉयटर्सने हा रिपोर्ट समोर आणला आहे.
दुबई का निवडले जाते ?
दुबई हे नेहमीच आरामदायी आयुष्यासाठी ओळखले जाते. दुबईच्या झगमगाटाची भूरळ कोणालाही पडू शकते. सुखी आयुष्याचा स्वप्ने रंगवून अनेक महिलांची फसवणूक राजरोसपणे केली जात आहे. कधी नोकरीच्या निमित्ताने तर कधी चांगले आयुष्य जगण्याच्या आमिषाने आफ्रिकेतील महिलांची फसवणूक होत आहे.
अशी केली जाते फसवणूक
गरीब आणि हतबल महिलांना आर्थिक आमिष दाखवले जाते. यामध्ये आफ्रिकेसारख्या देशापेक्षा दुबईत चांगले पैसे कमावले जाऊ शकते आणि परिस्थितीत बदल केले जाऊ शकतात अशा प्रकारची आशा दाखवली जाते. याला आफ्रिकेतील महिला बळी पडताना दिसून येत आहेत.
एका 25 वर्षीय महिलेने सांगितल्यानुसार ती जुलै 2019मध्ये नायजेरियातील सर्वात मोठ्या शहरात लागोसमध्ये एका दुकानात काम करत होती. तिला सांगितले गेले की, ती दुबईच्या एका स्टोरमध्ये एका विक्रेतेच्या रुपात आणखी पैसै कमाऊ शकते. तिला वाटले तिची मदत केली जात आहे. मात्र दुबईत आल्यानंतर तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले.
युएईमधून समोर आलेला हा रिपोर्ट 25 आफ्रिकी महिलांच्या इंटरव्हूवर आधारित आहे. या महिलांमध्ये नायजेरियामधील महिलांची संख्या जास्त आहे. ज्या महिलांची आर्थिक परिस्थीती हालाखीची आहे त्या महिला या मानवी तस्करीच्या बळी ठरतात असे दिसून आले आहे.
सुरुवातीला त्यांना पैशांचे आमिष दिले जाते. त्यानंतर पैसे उसने देऊन फसवण्याचा प्रयत्न केला जातो. जर महिला या आमिषांना बळी नाही पडल्या तर त्यांना धमकावले जाते तर कधी कधी हिसेंचादेखील वापर केला जातो.
अमानुष पद्धतीची वागणूक
दुबईत येण्यासाठी महिलांना कर्ज दिले जाते. या महिलांना दिलेली रक्कम 10 हजार डॉलर ते ( 8 लाख रुपए ) 15 हजार डॉलर ( 12 लाख भारतीय रु. ) एवढी असते. त्यामुळे महिलांची फसवणूक झाली तरीही त्या कर्जाच्या डोंगरामुळे त्यांचा मायदेशी परतण्याचा रस्ता बंद होतो.
महिलांना आफ्रिकेतून दुबईत घेऊन गेल्यानंतर क्रिस्टी गोल्ड त्यांना अत्यंत चूकीच्या पद्धतीने वागणूक देते. महिलांना पैसे कमावण्याचे टार्गेट दिले जाते. जर त्यांनी तेवढे पैसे कमावले नाहीत तर अशा महिलांना अतिशय वाईट पद्धतीने वागवले जाते.
अशा महिलांना एका अपार्टमेंटमध्ये बंद केले जाते. क्रिस्टीचा भाऊ त्यांना मारहाण करतो. इतकेच नाही तर महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडरदेखील टाकली जाते. अशा प्रकारची अमानुष वागणूक महिलांना दिली जाते.
वेश्याव्यवसायाचे अड्डे
पीडीत महिलांना दुसऱ्या कामाच्या निमित्ताने युएईमध्ये आणले जाते आणि वेश्याव्यवसायात ढकलले जाते. दरम्यान, काही महिलांनी स्वत:च्या मर्जीने वेश्याव्यवसाय निवडला आहे.
मात्र त्यांना इथे अतिशय वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. दुबईच्या अनेक भागांमध्ये मसाज पार्लरच्या नावावर वेश्यालय चालवत आहेत. याठिकाणी स्पा, डांस क्लब आणि बार मध्ये सेक्स वर्कर्स भरले आहेत.
युएई इस्लामिक कायद्यांचे पालन करतो. मात्र आता वेश्याव्यवसाय आणि सेक्ससाठी महिला तस्करीच्या केसेस आश्चर्यकारक आहेत.
वेश्यालयातही भेदभाव
आफ्रिकेतून तस्करी करुन आणलेल्या महिलांमध्ये वेश्याव्यवसायात रंगावरुनदेखील भेदभाव केल्याचे दिसून येते. युरोपमधून आणलेल्या गोऱ्या महिलांना श्रीमंत व्यक्तींकडे सोपवले जाते तर आफ्रिकेतून आणलेल्या सावळया रंगाच्या महिला कामगारांसाठी गल्लीबोळात आणि रस्त्यावरच्या कोपऱ्यात पाहायला मिळतात.
वीस वर्षाची एक नायजेरियन महिला सांगते की, तिला आणि तिच्याबरोबर आणखी दोन महिलांना एका अनोळखी शहरात एका पार्किंगमध्ये घेऊन जाण्यात आले. तिथे पेंटचे आणि दुरुस्तीचे काम सुरु होते. तिथे त्यांना मजूरांसोबत शरीरसंबंध बनवण्यासाठी भाग पाडले . रात्री उशीरा तस्कर त्यांच्याकडील सगळे पैसे घेऊन पळून गेले. जेवणासाठीदेखील त्यांच्याकडे पैसे उरले नव्हते, असा आपला अनुभव सांगते.
पैशांच्या बदल्यात शरीरसंबंध
2019च्या नवीन वर्षात लंडनमधील फोटोग्राफर आणि मानवी तस्करीच्या विरुद्ध काम करणारे थॉमस युएईमध्ये गेले होते. दुबईच्या सुपरमार्केटमध्ये फिरत असताना एका 19 वर्षीय नायजेरियन महिलेने त्यांना पैशांच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यांनी त्याला नकार देत तिला आपल्या देशात परतण्याची इच्छा आहे का अशी विचारणा केली तेव्हा तीने आपल्यासोबत आणखी 22 महिला असल्याची माहीती दिली. तेव्हा थॉमस यांनी लंडनमध्ये परतल्यावर तिला परत पाठवण्याची व्यवस्था केली . याबरोबरच त्यानंतर आणखी आठ महिलांना त्यांनी मायदेशी परत पाठवले आहे.
एंगस थॉमस ही कार्यकर्ती म्हणते- 'मी पत्र लिहली, फोन केले, इमेलदेखील केला अपार्टमेंटचा पत्तादेखील सांगितला मात्र युएईच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.'
Dainik Gomantak
अधिकाऱ्यांकडून मदत मिळत नाही
इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इंव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स आणि रॉयर्सने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, सेक्स तस्करीसाठी युएई आवडते ठिकाण बनले आहे.
नायजेरियाची राष्ट्रीय एजेंसीची महानिदेशक फातिमा वजिरी अजी म्हणतात- मानवी तस्करीच्या विरुद्ध काम करणारी एजेन्सी जेव्हा युएईच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली तेव्हा त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
घानामध्ये राहून तस्करीच्या विरुद्ध काम करणारी ब्रिटिशवंशाची एंगस थॉमसने देखील असाच अनुभव सांगितला आहे. ती म्हणते - मी पत्र लिहली, फोन केले, इमेल देखील केला अपार्टमेंटचा पत्तादेखील सांगितला मात्र युएईच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून वैश्याव्यवसायाचे आरोप निराधार सांगितले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वैश्याव्यवसायासाठी महिलांची तस्करीसाठी मोठा दंड आकारला जातो. याबरोबरच कैदेची शिक्षादेखील दिली जाते.
क्रिस्टी दावा करते की, मी नायजेरियातील महिलांना आणि पुरुषांना दुबईत येण्यासाठी मदत केली आहे. त्यांना भाड्याने एक अपार्टमेंटदेखील घेऊन दिले आहे. ती म्हणते मी त्यांना दुबईमध्ये जाण्यासाठी आईसारखा सल्ला देते मात्र दुबईत जाऊन ते काय काम करतात हे मी सांगू शकत नाही.
Dainik Gomantak
दरम्यान, ज्या महिलेवर हे रॅकेट चालवण्याचे आरोप आहेत ती क्रिस्टी गोल्ड स्वत:ला व्यापारी म्हणवते. तिच्या म्हणण्यानुसार, तीचा किंवा तिच्या भावाचा या महिलांच्या तस्करीचा काहीही संबंध नाही. ती जेव्हा 2009 मध्ये दुबईमध्ये आली तेव्हा पासून ती सोने, कपडे आणि हॅंडबॅग खरेदी करुन नायजेरियामध्ये विकते.
क्रिस्टी दावा करते की, मी नायजेरियातील महिलांना आणि पुरुषांना दुबईत येण्यासाठी मदत केली आहे. त्यांना भाड्याने एक अपार्टमेंटदेखील घेऊन दिले आहे. ती म्हणते मी त्यांना दुबईमध्ये जाण्यासाठी आईसारखा सल्ला देते मात्र दुबईत जाऊन ते काय काम करतात हे मी सांगू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.