कोपनहेगन: डेन्मार्क येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नारळपाणी पिल्याने ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीने घेतलेले नारळपाणी चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.
संसर्गजन्य रोग जर्नलमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला असून, एक्सपायर झालेले किंवा दुषित झालेला कोणताही पदार्थ खाल्यास उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याचा इशारा देत आहे. या घटनेबाबत उपलब्ध माहितीनुसार, उघड्यावर पूर्वीच सोलून ठेवण्यात आलेल्या नारळातील पाणी या व्यक्तीने पिले होते. पाण्याची चव खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पाणी पिणे बंद केले. नारळ उघडल्यावर त्याच्या आतील भाग सडलेला असल्याचे दिसले. रेफ्रिजरेशन न करता जवळजवळ महिनाभर हा नारळ स्वयंपाकघरातील टेबलावर तसाच होता.
पाणी पिल्यानंतर काही तासांतच, त्या माणसाला मळमळ, उलट्या, घाम येणे, गोंधळ आणि शरिराचे संतुलन राखण्यात अडचण येऊ लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या मेंदूला गंभीर सूज असल्याचे दिसून आले. दरम्यान, 26 तासांनी त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते नारळ सोलल्यानंतर त्याचा पांढरा भाग दिसू लागल्यानंतर तो नाशवंत होतो. सोललेला नारळ हवाबंद डबा किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याचा सल्ला सिंगापूर येथील अन्न सुरक्षा तज्ज्ञ डॉ. सॅम्युअल चौधरी सल्ला देतात. असा नारळ 3-5 दिवसांसाठी सुरक्षित राहतात तसेच, व्यवस्थित रेफ्रिजरेशन केल्यास सहा महिने सुरक्षित राहू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.