शाळेत (school) जायचे नसल्यास मुले (Children)अनेक शक्कल लढविताना आपण बऱ्याचदा पाहिले आहे. मग कधी त्यांची दाढ दुखणे, पोट दुखणे, डोके दुखणे ही कारणे समोर येतात. पण काही देशांमधील मुले आता इतकी पुढे गेली आहेत की, कोरोना पॉझिटीव्ह (Covid 19) नसताना देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्यास अनेक ट्रीक अवलंबत असल्याचे समोर येत आहे. या आणखीन एक धक्कादायक (Shocking) बाब म्हणजे, टेस्टिंग किटदेखील मुलांच्या या ट्रीक्स (Tricks) समोर फेल ठरत आहे.
काही देशांमधील मुले शाळेला जायचे नसल्यास थेट खोटे कोरोना रिपोर्ट दाखविण्याची शक्कल लढवत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ब्रिटनच्या एका विद्यापीठाचे प्राध्यापक मार्क लॉर्च यांनी ही बाब समोर आणली आहे. ते म्हणाले, मुलांची चलाखी इतकी वाढली आहे, लेटरल फ्लो टेस्ट (LFT) किटमध्ये सॉफ्ट ड्रिंक किंवा फळांचा रस टाकल्यास त्यातील आम्लामुळे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. मी स्वत: हा प्रयोग करुन पाहिला, कोला आणि फळांचा रसाचे थेंब टेस्टिंग किटमध्ये टाकले असता काही मिनिटांतच किटवर लाल रंगाची लाईन दिसू लागली. तांत्रिक दृष्ट्या त्या सॅम्पलमध्ये कोरोनाचे विषाणू असल्याचे सिध्द झाले.
पण प्रत्यक्षात मात्र त्यात कोरोना नसून आम्ल होते. किट उघडल्यावर यात कागदी नायट्रोसॅलूलोजची पट्टी आणि छोटी लाल रंगाची जाळी सापडली. ही जाळी कोरोना व्हायरसला पकडण्यासाठी अँटीबॉडी असते. ती गोल्ड नॅनोपार्टिकलची असून, त्यानुसार एलएफटी टेस्ट करण्यात येते. जेव्हा सॅम्पल बफर सोल्यूशनमध्ये मिसळले जाते, यामुळे स्ट्रीपवर पडल्यावर त्याचा पीएच स्तर योग्य रहावा. फळांच्या रसामध्ये आणि सॉफ्ट ड्रिंकमध्ये असलेले आम्ल हे अँटीबॉडी प्रभावित करते. यात संत्रे-सायट्रिक अँसिड, कोला-फॉस्फोरिक अँसिड आणि अन्य फळांमध्ये असलेली अँसिड आहेत. ज्यात पीएच चे प्रमाण २.५ ते ४ एवढी असते. त्याचा अँटीबॉडीवर परिणाम होतो. त्यामुळे टेस्ट पॉझिटीव्ह येते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.