Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

Sheikh Hasina: 'हातकड्या घालूनच परत आणू...', शेख हसीना यांच्या घरवापसीवर बांगलादेशी परराष्ट्र मंत्र्यांची धमकी; 16 डिसेंबरचा प्लॅन फसणार

Humayun Kabir Statement Sheikh Hasina Handcuffs Extradition: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेवरुन आता बांगलादेशच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला.

Manish Jadhav

Humayun Kabir Statement Sheikh Hasina Handcuffs Extradition: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेवरुन आता बांगलादेशच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला. शेख हसीना यांनी येत्या 16 डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी विद्यमान सरकारने त्यांना सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे देशात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना हसीना यांना केवळ हातकड्या घालूनच देशात परत आणले जाऊ शकते, असा आक्रमक पवित्रा घेतला. हसीना यांची इच्छा आणि देशातील प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असून, त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर प्रत्यार्पण प्रक्रियाच राबवावी लागेल, असे कबीर यांनी ठामपणे सांगितले.

ढाका येथील परदेशी राजदूतांना देशातील सद्यस्थितीची माहिती दिल्यानंतर कबीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणतीही व्यक्ती परतण्याचे स्वप्न पाहू शकते, मात्र हसीना या सामान्य विमान प्रवासी नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे, हसीना यांचे प्रवक्ते सय्यद मोजम्मेल अली यांनी सांगितले की, 16 डिसेंबर हा बांगलादेशचा विजय दिवस असून 1971 मध्ये याच दिवशी पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली होती.

5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशच्या (Bangladesh) विमानानेच हसीना यांना भारतात आणण्यात आले होते; त्यामुळे आता दिल्लीतून ढाक्याला परतण्यासाठी 'बांगलादेश एअरलाइन्स'च्या विमानाची व्यवस्था करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले.

सुमारे सोळा वर्षे बांगलादेशावर राज्य करणाऱ्या शेख हसीना ऑगस्ट 2024 मधील विद्यार्थी आंदोलनानंतर भारतात आल्या. नोव्हेंबर 2025 मध्ये बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने आंदोलनातील हिंसाचाराप्रकरणी त्यांना दोषी ठरवत त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली, जी हसीना यांनी फेटाळली. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार या आंदोलनात सुमारे चौदाशे जणांचा बळी गेला. हसीना दिल्लीत बसून अवामी लीगच्या कारवायांना पाठबळ देत असल्याचा आरोप कबीर यांनी केला असून, भारताने बांगलादेशच्या प्रत्यार्पण विनंतीवर विचार सुरु असला तरी याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Football League: धेंपो क्लबला काश्मीरमध्ये 3-1 ने धक्का; रियल काश्मीरने उघडले विजयाचे खाते

Aguada Fort Wall Collapse: 400 वर्षे जुन्या आग्वाद किल्ल्याच्या खंदकाची भिंत कोसळली; ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न

Sparrow Conservation: चिमणीच्या अंड्यांसाठी अख्ख्या गावाने 35 दिवस वीज बंद ठेवली! सत्यघटनेवर आधारित 'कूदू'ची इफ्फीत चर्चा

International Cricket: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएलच्या खास नियमाची एन्ट्री! 'बॅट गॉज' आणण्याचा आयसीसीचा प्लॅन; फलंदाजांवर आता करडी नजर

Rahu Ketu Gochar: राहू-केतूचे गोचर ठरणार आव्हानात्मक; तूळ राशीच्या खर्चात वाढ, धनु राशीला आर्थिक चिंता तर मकर राशीने व्यवहारात राहावे सावध!

SCROLL FOR NEXT