Sheikh Hasina Dainik Gomantak
ग्लोबल

Sheikh Hasina: 499 दिवसांनंतर मायदेशी परतणार शेख हसीना! 16 डिसेंबरच तारीख का निवडली? बांगलादेशात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

Sheikh Hasina Return Bangladesh 16 December 2026: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना तब्बल पाचशे दिवसांहून अधिक काळ चाललेल्या निर्वासनानंतर अखेर मायदेशी परतणार आहेत.

Manish Jadhav

Sheikh Hasina Return Bangladesh 16 December 2026: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना तब्बल पाचशे दिवसांहून अधिक काळ चाललेल्या निर्वासनानंतर अखेर मायदेशी परतण्याच्या तयारीत असून, त्यांच्या परतीचा दिवस निश्चित झाल्याची माहिती समोर आली. 16 डिसेंबर 2026 रोजी म्हणजेच बांगलादेशच्या ऐतिहासिक विजय दिनाच्या दिवशी त्या मायभूमीत पाऊल ठेवणार असल्याचे त्यांचे प्रवक्ते सय्यद मोजम्मेल अली यांनी स्पष्ट केले.

5 ऑगस्ट 2024 रोजी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संवैधानिक पेच निर्माण झाल्यानंतर त्या बांगलादेशच्या विमानाने भारतात (India) आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता तारिक रेहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरकारी विमानाची आणि आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था करुन त्यांना सन्मानाने परत आणावे, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांकडून मांडली जात आहे.

दुसरीकडे, शेख हसीना यांच्या संभाव्य आगमनापूर्वीच बांगलादेशात राजकीय अस्थिरता आणि तणावाचे वातावरण अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मायदेशात उतरताच त्यांना अटक करण्याचे आदेश सरकारने दिल्याची चर्चा असून, त्यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी असल्याने राजकीय पातळीवर मोठी कोंडी निर्माण झाली. सरकारमधील मंत्र्यांनी माध्यमांसमोर दिलेल्या संकेतांनुसार, त्यांना सुनावण्यात आलेल्या कठोर शिक्षेच्या पार्श्वभूमीवर तात्काळ कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी शेख हसीना यांनी पासपोर्ट व इतर दस्तऐवजांची मागणी केली होती, तर भारताने त्यांच्या सुरक्षिततेबाबत भूमिका स्पष्ट केली असली तरी ढाका प्रशासन कोणत्याही अटी मान्य करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

विजय दिनाच्या ऐतिहासिक मुहूर्तावर होणारी ही संभाव्य घरवापसी बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणासोबतच दक्षिण आशियातील कूटनीतीसाठीही अत्यंत संवेदनशील ठरत आहे. विमान पाठवण्याबाबत भारताशी अद्याप कोणताही अधिकृत संवाद झालेला नसल्याचे सांगितले जात असले, तरी 16 डिसेंबर रोजी प्रत्यक्षात काय घडते आणि अटक झाल्यास भारत-बांग्लादेश संबंधांवर त्याचे कोणते पडसाद उमटतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: आता हिशोब चुकता होणार! भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार, पराभवाचा बदला घेण्यासाठी तिलकची 'यंग ब्रिगेड' सज्ज

Goa Politics: 'वीरेश बोरकर यांना जसे घडवले, तसेच राजकारणातून संपवेन'; मनोज परब यांचा थेट इशारा

One Day Assembly Session: एकदिवसीय अधिवेशनावरून विरोधक आक्रमक; सरकारवर लोकशाहीच्या हत्येचा आरोप

खरी कुजबुज: 'भिवपाची गरज ना'

Technology Dependence Study: आवडत नसले तरी ॲप वापरणं का थांबत नाही? 97 संशोधनांतून समोर आली महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT