Canada Prime Minister Justin Trudeau 
ग्लोबल

Viral Video: "शेम ऑन यू!" आंदोलकांच्या रोषापुढे Justin Trudeau हतबल, भरल्या ताटावरुन जावे लागले पळून

Canada Prime Minister Justin Trudeau: भारतविरोधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची त्यांच्याच देशात वाईट अवस्था आहे. लोक ट्रुडो यांना त्यांच्या तोंडावर शिव्याशाप देत आहेत.

Ashutosh Masgaunde

"Shame on you!" Justin Trudeau was forced by protesters to run away from a plate full of:

भारतविरोधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची त्यांच्याच देशात वाईट अवस्था आहे. लोक ट्रुडो यांना त्यांच्या तोंडावर शिव्याशाप देत आहेत. काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या एका नागरिकाने ट्रुडो यांना मोठ्या ताफ्यासह प्रवास करून युक्रेनला लाखो डॉलर्सची मदत दिल्याबद्दल खडसावले होते.

आता व्हँकुव्हरमध्ये, आंदोलकांच्या एका गटाने जस्टिन ट्रुडो यांचा रेस्टॉरंटमधून पाठलाग केला. परिस्थिती इतकी बिघडली की, आंदोलकांना हाताळण्यासाठी 100 पोलिसांना तैनात करावे लागले. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रुडो व्हँकुव्हरमधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी पोहोचले होते. पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांना याची माहिती मिळाली.

रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून त्यांनी इस्रायल-गाझा युद्धाबाबत कॅनडाच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी दर्शवली. आंदोलकांनी घोषणाबाजी करत ट्रुडो यांचे जेवण उधळून लावले.

प्रकरण वाढत असल्याचे पाहून 100 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आणि पीएम ट्रुडो यांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढण्यात आले. आंदोलकांनी ट्रूडो यांच्या विरोधात “तुम्हाला लाज वाटली पाहिजे” आणि “तुम्ही नरसंहारासाठी निधी देत ​​आहात” अशा घोषणाही दिल्या.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जस्टिन ट्रुडो टोरंटो येथील मशिदीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.

प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांनी इस्रायल-हमास संघर्षात कॅनडाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यापूर्वी, कॅनडाच्या 33 खासदारांनी ट्रुडो यांना पत्र लिहून गाझामध्ये युद्धविराम आणि लोकांना मदत करण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉरसाठी त्वरित प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

पत्र लिहिणाऱ्यांमध्ये माजी कॅबिनेट मंत्री ओमर अलघाब्रा, लिबरल पार्टी, न्यू डेमोक्रॅटिक पार्टी तसेच ग्रीन पार्टीचे खासदार यांचा समावेश होता.

ट्रुडो यांच्या विरोधाच्या बातम्या आता कॅनडामध्ये सामान्य झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर ट्रुडो यांचा प्रचंड अपमान केला होता.

तो ट्रूडो यांना म्हणाला की, तुम्ही वाईट माणूस आहात. तुम्ही कॅनडाचा नाश केलात. मी तुमच्याशी हस्तांदोलन करणार नाही.

या मुद्द्यावर ट्रुडो यांचा त्या व्यक्तीशी वादही झाला होता. त्यांनी ट्रुडो यांना त्यांच्या ताफ्यातील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रश्न विचारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT