Arrested Dainik Gomantak
ग्लोबल

लंडनमध्ये सेक्स वर्करची हत्या, 30 वर्षांनंतर झाला मोठा खुलासा; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा

London Crime News: लंडनमध्ये एका सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी 51 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Manish Jadhav

London Crime News: लंडनमध्ये एका सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी 51 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 30 वर्षांपूर्वी संदीप पटेल याने वेस्टमिन्स्टर भागात एका 39 वर्षीय सेक्स वर्करची हत्या केली होती. त्याने तिच्यावर चाकूने 140 वार केले होते. मरिना कोप्पलच्या हत्येप्रकरणी 28 वर्षे त्याचे नावही कुठेही आले नाही. 2022 मध्ये त्याच्या नावावर गुन्हा दाखल झाला होता आणि आता न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

आरोपी कसा पकडला गेला?

दरम्यान, कोप्पलच्या एका अंगठीवर एक केस अडकला होता. खुनाच्या ठिकाणाहून ही अंगठी जप्त करण्यात आली होती. या केसाचा डीएनए मॅच केला असता संदीप पटेलची माहिती मिळाली. घटनास्थळावरील पायाचे ठसेही पटेल याचेच असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस विभागाचे ऑपरेशनल फॉरेन्सिक मॅनेजर डॅन चेस्टर यांनी सांगितले की, मरीनाच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. याचे श्रेय फॉरेन्सिक सायंटिस्ट, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, फॉरेन्सिक मॅनेजर आणि संपूर्ण तपास पथकाला जाते.

वास्तविक, मरिना पूर्णवेळ मसाजचे काम करायची. जरी ती अर्धवेळ सेक्स वर्कर होती. तिला दोन मुलेही होती. मरिना घरी न परतल्याने पतीने शोधाशोध सुरु केली होती. याचदरम्यान मरीनाचा मृतदेह सापडला.

प्लास्टिकच्या कॅरीबॅगवर पटेल याच्या बोटांचे ठसे आढळून आले होते मात्र त्याची ओळख पटू शकली नव्हती. मात्र, 2008 मध्ये अंगठीवरील केसाची डीएनए (DNA) चाचणी करण्यात आली. या केसाचा डीएनए मॅच केला असता संदीप पटेलची माहिती मिळाली. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी 14 वर्षे लागली.

दरम्यान, पटेल हा दुसऱ्या एका प्रकरणातही आरोपी होता. त्या प्रकरणी त्याची डीएनए नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. हत्येनंतर पटेलच्या घराजवळ मरीनाचे बँकेचे कार्डही सापडले होते. याहू न्यूजनुसार, गेल्या वर्षीच पोलिसांना (Police) पटलेच्या पायाचे ठसे मरीनाच्या खोलीत सापडलेल्या पायाच्या ठशांशी मॅच करुन पाहिले होते. मरिनाच्या पतीचेही 2005 मध्ये निधन झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT