Plane Crash  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमधील प्लेन क्रॅशचे रहस्य उलघडणार; दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला

विमानाचा एक ब्लॅक बॉक्स आधीच सापडला होता.

Akash Umesh Khandke

21 मार्च रोजी चीनमध्ये क्रॅश झालेल्या विमानाचा दुसरा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आता अपघाताचे नेमके कारण समजणार आहे. चीनमध्ये क्रॅश झालेल्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा दुसरा ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी गुरुवारी अपघातस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू होती. विमानाचा एक ब्लॅक बॉक्स आधीच सापडला होता.

पहिल्या ब्लॅक बॉक्सच्या डेटाचे विश्लेषण सुरू
अपघातग्रस्त विमानाचा पहिला ब्लॅक बॉक्स बुधवारी सापडला होता. तो बीजिंगस्थित प्रयोगशाळेत डीकोडिंगसाठी पाठवण्यात आला असून डेटाचे विश्लेषण सुरू आहे. या बॉक्समध्ये किंवा कॉकपिट रेकॉर्डरमध्ये इंजिनचे आवाज, ऑडिओ अलर्ट आणि बॅकग्राउंड साऊंड कॅप्चर केले जात असल्याने बरीच माहिती मिळू शकेल, अशी आशा चीनच्या नागरी उड्डयन प्रशासनाच्या एव्हिएशन सेफ्टी ऑफिसने व्यक्त केली आहे. त्यामुळे अपघाताचे (Accident) योग्य कारण कळू शकते.


कोणीही जिवंत पळून गेल्याचा सुगावा नाही
कुनमिंग शहरातून चीनच्या (China) गुआनझूला जाणारे बोइंग 737-800 विमान सोमवारी वुझोउ शहरातील डोंगराळ भागात कोसळले. विमानात 132 लोक होते, त्यापैकी अद्याप कोणाचाही पत्ता लागलेला नाही. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी शोधकार्यात व्यत्यय आला. गुरुवारी घटनास्थळी इंजिनचे काही भाग सापडले. शोध पथकाला आतापर्यंत विमानाच्या अवशेषाचे 183 तुकडे, मृतांचे अवशेष आणि सामान सापडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT