ल्विव्ह शहरावर रशियाने डागले रॉकेट; स्फोटांनी हादरले नागरिक

ल्विव्ह शहर हजारो लोकांसाठी आश्रयस्थान बनले आहे.
Lviv
Lviv Dainik Gomantak
Published on
Updated on

रशियाने शनिवारी युक्रेनमधील ल्विव्ह शहरावर अनेक रॉकेट डागले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पोलंडची राजधानी वॉर्सा येथे उपस्थित असताना हा हल्ला झाला. ल्विव्ह ते वॉर्सा हे अंतर फक्त 40 मैल आहे. या शक्तिशाली स्फोटांनी पूर्ण शहर हादरले.

Lviv
पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, पक्षाचे 50 मंत्री झाले 'बेपत्ता'

ल्विव्ह हे हजारो लोकांसाठी आश्रयस्थान बनले आहे जे युक्रेनच्या (Ukraine) इतर भागात पळून तिथे गेले आहेत. गव्हर्नर, मॅक्सिम कोझित्स्की यांनी फेसबुकवर लिहिले की, पहिल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र दोन रॉकेट हल्ल्यांमुळे काय नष्ट झाले हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

गेल्या आठवड्यात विमानतळाजवळ हल्ला झाला होता
ल्विव्हचे महापौर आंद्रे सडोवी यांनी दुसऱ्या रॉकेट हल्ल्याबाबत सांगितले की, या हल्ल्यात बरेच नुकसान झाले आहे. रशियाने (Russia) 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला, मात्र ल्विव्ह वर हल्ला करण्यात आला नव्हता.

Lviv
''इम्रान खान अन् पत्नी बुशरा बीबीने घेतली सहा अब्जांची लाच''

'त्याने आश्रय घेतला तिथून काही अंतरावर स्फोट झाला'
खार्किवमधून ल्विव्हला आलेल्या ओलानाने सांगितले की, आमच्यासोबत अनेक लोकांनी ब्लॉकखाली असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये आश्रय घेतला आहे.पहिला स्फोट अपार्टमेंटपासून काही अंतरावर झाला यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.

'स्फोटाने काचा फुटल्याचा आवाज आला'
34 वर्षीय कर्मचाऱ्याने स्फोटाबाबत सांगितले की, आम्ही रस्त्याच्या (Road) एका बाजूला होतो आणि दुसऱ्या बाजूला आग लागली होती. मी माझ्या मित्राला म्हणालो, हे काय आहे? तेव्हाच आम्हाला मोठा आवाज ऐकू आला. आम्ही इमारतींमध्ये लपलो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com