Saudi Coalition Airstrikes In Yemen Hodeidah Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia Airstrike: मध्यपूर्वेत युद्धाचा भडका! सौदीने येमेनवर 24 तासांत डागली 81 क्षेपणास्त्रे; 15 जणांचा मृत्यू, हुतींचे 60 लष्करी तळ उद्ध्वस्त

Saudi Coalition Airstrikes In Yemen Hodeidah: येमेनच्या हुदैदा शहरातील अल-खौलानी स्पंज फॅक्टरीवर सौदी सैन्याने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये जीवितहानीची संख्या झपाट्याने वाढून मृतांचा आणि जखमींचा आकडा 28 वर पोहोचला.

Manish Jadhav

Saudi Coalition Airstrikes In Yemen Hodeidah: येमेनच्या हुदैदा शहरातील अल-खौलानी स्पंज फॅक्टरीवर सौदी सैन्याने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये जीवितहानीची संख्या झपाट्याने वाढून मृतांचा आणि जखमींचा आकडा 28 वर पोहोचला. येमेनच्या आरोग्य आणि पर्यावरण मंत्रालयाने बुधवारी एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. फॅक्टरीवर झालेल्या या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 15 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले.

बचाव पथकाकडून ध्वस्त इमारतींच्या मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, परंतु स्फोटानंतर मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे मृतांची ओळख पटवण्यात प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येमेनच्या सशस्त्र फौजांचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी सैन्याने गेल्या चोवीस तासांत राजधानी सानासह हुदैदा, ताइज, मारिब आणि सादा यांसारख्या प्रमुख प्रांतांवर तब्बल 81 क्षेपणास्त्र हल्ले केले.

सौदी अरेबियाची (Saudi Arabia) राजधानी रियाद आणि देशातील तेल पाइपलाइन्सवर अलीकडेच झालेल्या हुती बंडखोरांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी युती सैन्याने ही मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत युती सैन्याने येमेनमधील विभिन्न भागात सक्रिय असलेल्या हुती बंडखोरांच्या तब्बल 60 गुप्त लष्करी ठिकाणांना पूर्णपणे बेचिराक केले. साना, हुदैदा आणि अमरानसह चार प्रमुख प्रांतांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून, या हिंसाचारात सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Services Sports Festival: अग्निशमन जवान मैदानात उतरणार! पणजीत 14 व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन; चार दिवस विविध स्पर्धांचा थरार

Under 19 Cricket: 'देशासाठी करंडक जिंकण्याची अखेरची संधी'; गोव्याच्या व्यंकटची आशिया विजेतेपदामागची प्रेरणादायी कहाणी

रक्षकच भक्षक बनले तर मुलांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? गोव्यातील घटनांनी व्यवस्था आणि समाजासमोर गंभीर प्रश्न

Surya Gochar 2026: धन आणि समृद्धीचा योग! सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनाने 5 राशींच्या आयुष्यात येणार आर्थिक स्थिरता आणि भरभराट; भाग्य उजळणार

Goa Politics: मगोच्या 'एकला चलो रे'चा भाजपला मोठा फटका? फोंडा, शिरोड्यासह 5 जागांवर नजर

SCROLL FOR NEXT