Saudi Arabia Yemen Airstrike Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia Airstrike: मध्यपूर्वेत युद्धाचा भडका! सौदीचा येमेनवर ताबडतोड हवाई हल्ला; UAE कडून आलेली शस्त्रास्त्रांची जहाजे उद्ध्वस्त Watch Video

Middle East Tensions: मध्यपूर्वेतील राजकारण आणि येमेनमधील यादवी युद्धाला आता एक नवीन आणि धोकादायक वळण मिळाले आहे.

Manish Jadhav

Saudi Arabia Yemen Airstrike: मध्यपूर्वेतील राजकारण आणि येमेनमधील यादवी युद्धाला आता एक नवीन आणि धोकादायक वळण मिळाले आहे. सौदी अरबच्या हवाई दलाने मंगळवारी (30 डिसेंबर) येमेनच्या मुकल्ला शहरावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात संयुक्त अरब अमिरातीकडून फुजैराह बंदरातून आलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोठ्या साठ्याला लक्ष्य करण्यात आले. या कारवाईनंतर परिसरात आगीच्या प्रचंड ज्वाळा उसळताना दिसत असून सौदी आणि युएई या दोन मित्रराष्ट्रांमधील संबंधांमध्ये आता मोठी दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सौदीचा हल्ला

सौदी प्रेस एजन्सीने जारी केलेल्या लष्करी निवेदनात या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली. सौदी अरबच्या मते, युएईच्या फुजैराह बंदरातून दोन जहाजे मुकल्ला बंदरात दाखल झाली होती. या जहाजांवरुन शस्त्रास्त्रे आणि युद्धक वाहने उतरवली जात असतानाच सौदीच्या विमानांनी त्यावर मारा केला. सौदी अरबने दावा केला की, ही शस्त्रास्त्रे येमेनमधील 'साउदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल' या फुटीरतावादी गटासाठी पाठवण्यात आली होती. हे कृत्य येमेनची सुरक्षा आणि स्थैर्य धोक्यात आणणारे असल्याचे सांगत सौदीने याला "मर्यादित लष्करी ऑपरेशन" असे संबोधले.

मित्रराष्ट्रांमधील वाढता तणाव

येमेनमध्ये (Yemen) गेल्या दशकापासून सुरु असलेल्या युद्धात सौदी अरब आणि युएई हे दोघेही इराण समर्थित हूती बंडखोरांविरुद्ध एकत्र लढत होते. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. युएई ज्या फुटीरतावादी गटाला पाठिंबा देत आहे, तो गट सौदीच्या समर्थित असलेल्या येमेन सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. या हल्ल्यामुळे आता रियाध आणि अबू धाबी यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या घटनेवर युएईने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या हल्ल्याचे पडसाद जागतिक राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे.

येमेनमध्ये आणीबाणीची घोषणा

सौदीच्या या हवाई हल्ल्यानंतर येमेनमधील हूती-विरोधी दलांनी मंगळवारी संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हूती-विरोधी दलांनी आपल्या ताब्यातील सर्व सीमांवर 72 तासांसाठी कडक निर्बंध लादले. इतकेच नाही तर देशातील विमानतळ आणि बंदरांवर प्रवेश बंदी करण्यात आली. आता केवळ सौदी अरबची परवानगी असलेलेच बंदर आणि मार्ग खुले राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत. मुकल्लामध्ये ज्या बख्तरबंद वाहनांना आणि अत्याधुनिक शस्त्रांना लक्ष्य करण्यात आले, त्यामुळे फुटीरतावादी गटाचे मोठे नुकसान झाले.

युद्धाचे स्वरुप बदलणार?

येमेनमध्ये सुरु असलेले युद्ध आता केवळ हूती बंडखोरांविरुद्ध राहिलेले नसून ते मित्रराष्ट्रांच्या आपापसातील संघर्षात रुपांतरित होत आहे. इराण समर्थित हूती बंडखोरांनी या वादाचा फायदा घेण्याची तयारी सुरु केली असून मध्यपूर्वेतील हा तणाव तेलाच्या किमतीवर आणि जागतिक व्यापारावर परिणाम करु शकतो. सौदी अरबने (Saudi Arabia) घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता युएई कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT