Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Saudi Arabia: सूदानच्या गृहयुद्धात सौदी अरेबियाने भारतासाठी उचलले मोठे पाऊल

Saudi Arabia: सूदानची राजधानी खार्तूनमध्ये हजारो भारतीयांचे जीव धोक्यात आहेत.

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia: सूदानमध्ये सध्या भीषण गृहयुद्ध सुरु असून सत्ता काबीज करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. यादरम्यान, सौदी अरबने सूदानमधील भारतीय नागरिकांसहित इतर देशांच्या नागरिकांना सुरक्षितपणे सूदानमधून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, त्यांनी अनेक नागरिकांना सूदानमधून बाहेर काढले आहे. त्यामध्ये 91जण सामील आहेत. या विदेशी नागरिकांमधील 66नागरिक हे सौदी अरेबियाच्या मित्रराष्ट्रांमधील आहेत. यामध्ये भारतशिवाय कुवेत, कतार, ट्यूनीशिया, पाकिस्तान, यूएई, बल्गेरिया, बांग्लादेश, फिलीपाइन्स आणि कॅनडासारखे देश सामील आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सुदानमधील भारतीयांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय बैठकीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. सुदानची राजधानी खार्तूनमध्ये हजारो भारतीयांचे जीव धोक्यात आहेत.

सध्या 4000 भारतीय सूदानमध्ये अडकले आहेत. सुदानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून देशाचे लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये प्राणघातक संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. अंदाधुंद गोळीबारामुळे सुदानमधील भारतीयांना अन्न, पाणी, औषधे आणि वीज या मूलभूत गोष्टींची कमतरता भासत आहे.

पन्नास लाख लोकांच्या घरात वीज आणि पाणी नाही. दळणवळण व्यवस्थाही ठप्प झाली आहे. आता सूदानमधील सत्तेसाठी चालू असलेले गृहयुद्ध कधी संपणार, भारताची यावर काय भूमिका असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT