Baba Vanga: बाबा वेंगाची झोप उडवणारी भविष्यवाणी, मोठ्या लोकसंख्येवर मृत्यूचा धोका!

Baba Vanga Predictions For 2023: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते.
Baba Vanga
Baba VangaDainik Gomantak
Published on
Updated on

Baba Vanga Predictions For 2023: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. यानंतर आता लोकांना बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घ्यायचे आहे.

मोठ्या लोकसंख्येवर मृत्यूचा धोका

बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षाबद्दल एक धोकादायक भविष्यवाणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, यावर्षी धोकादायक बायोवेपनचा वापर दिसून येईल आणि असे झाल्यास मृत्यूचा धोका जगाच्या लोकसंख्येवर मोठ्या दिसून येईल. बाबा वेंगा यांनी बायोवेपन बद्दल असेही म्हटले होते की, मोठ्या लोकसंख्येवर (Population) मोठा देश त्याचा वापर करु शकतो.

Baba Vanga
Baba Vanga Predictions: बाबा वेंगाचं 2023 चं भाकित ठरलं खरं, लवकरच येणार विनाशकारी वादळ!

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल

बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या भाकितांनुसार, 2023 मध्ये सर्वात मोठी खगोलीय घटना घडेल आणि पृथ्वीची कक्षा बदलेल. या घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे, पृथ्वीवर (Earth) अनेक बदल शक्य आहेत. याशिवाय बाबा वेंगा यांनी 2028 मध्ये व्हीनसवर अंतराळवीराच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती.

5079 मध्ये जगाच्या अंताची भविष्यवाणी

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये, अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने, लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील. याशिवाय त्यांनी जगाच्या अंताची भविष्यवाणी केली होती. 5079 साली जगाचा अंत होईल, असे सांगितले होते.

Baba Vanga
Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भारताबाबत भविष्यवाणी, 2023 मध्ये होणार मोठा विनाश!

2022 मध्ये भारतात उपासमारीची भविष्यवाणी

द सनच्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये भारतात (India) उपासमारीची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, 2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल आणि त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल, ज्याचा परिणाम भारतावरही होईल.

टोळांच्या हल्ल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होईल आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारतात (India) तीव्र उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Baba Vanga
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची ही 4 भाकिते येत्या काही महिन्यांत ठरु शकतात खरी!

ही 19 वर्षांची मुलगी नव्या युगाचा बाबा वेंगा बनली

दरम्यान, अमेरिकेतील (America) एक 19 वर्षीय मुलगी समोर आली आहे, जिला लोक नव्या युगाची बाबा वेंगा म्हणत आहेत.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे राहणारी हॅना कॅरोल तिच्या भविष्यवाण्यांमुळे चर्चेत आहे, जिने 2022 च्या सुरुवातीला महाराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे.

याशिवाय, हॅनाने किम कार्दशियन, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) यांच्या आई बनण्याचे भाकीत देखील केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com